Sakshi Sunil Jadhav
बऱ्याच व्यक्तींसाठी लोकांसाठी एक मुख्य आणि एक बचत किंवा बॅकअप अकाउंट पुरेसे ठरू शकते.
सॅलरी, घरखर्च, बिल आणि रोजचे व्यवहार मुख्य अकाउंटमधून करता येतात.
आर्थिक उद्दिष्टे किंवा आपत्कालीन गरजांसाठी स्वतंत्र अकाउंटमध्ये पैसे ठेवता येतात.
मुख्य अकाउंटमध्ये तांत्रिक अडचण आल्यास दुसऱ्या अकाउंटमधून व्यवहार करता येतात.
उत्पन्नाचे अनेक स्रोत, वेगवेगळ्या आर्थिक उद्दिष्टे किंवा विशेष बँकिंग गरज असेल तर तिसरे अकाउंट फायदेशीर ठरू शकते.
फक्त ऑफर, कॅशबॅक किंवा छोट्या फायद्यांसाठी सतत नवीन अकाउंट उघडणे टाळा.
किमान शिल्लक, शुल्क, अलर्ट आणि विविध नियम सांभाळताना आर्थिक व्यवस्थापनमध्ये गुंतागुंत होऊ शकते.
अकाउंटची गरज, किमान बॅलन्स, शुल्क, ATM, ट्रान्सफर आणि डिजिटल सुरक्षेची माहिती तपासा. मगच नवीन अकाउंट काढा.
तुम्ही वापरत नसलेले आणि कोणताही स्पष्ट उद्देश नसलेले अकाउंट बंद करण्याचा विचार करून बँकिंग व्यवस्था सोपी ठेवा. त्याने तुमचा गोंधळ होणार नाही.