Dhanteras Bank Holiday Today News  AI Image
बिझनेस

Bank Holiday : धनत्रयोदशी बँक बंद राहणार की सुरु? जाणून घ्या RBI चे महत्त्वाचे अपडेट्स

Bank Holiday Today Update News : नोव्हेंबर २०२६ मध्ये बँका कोणत्या दिवशी बंद राहणार? RBI ची राज्यनिहाय बँक सुट्ट्यांची यादी, रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • नोव्हेंबर महिन्यात विविध सण उत्सवांमुळे काही राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत

  • 9, 10, 11 आणि 24 नोव्हेंबर या तारखांना अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल

  • महाराष्ट्रातील बँकांन 10 आणि 24 नोव्हेंबर रोजी सुट्टी असेल

  • 8, 15, 22 आणि 29 नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील

सर्वत्र दिवाळीची सुरुवात झाली असून शाळा कॉलेजसह मोठं मोठ्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची देखील सुट्टी सुरु झाली आहे. असं असलं तरी बँक सुरु की बंद असणार याबाबत सगळ्यांना प्रश्न पडला असेल. दरम्यान आज धनतेरस असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) सुट्ट्यांच्या वेळापत्रकानुसार, बँक आज सुरु राहणार आहेत. तसेच उद्या म्हणजे शनिवारी बँक बंद राहतील. दिवाळीचा सण जवळ आला की अनेक जण सोने-चांदी खरेदी करण्यापासून ते नवीन गाडी किंवा घर घेण्यापर्यंतचे बेत आखतात. अशा वेळी बँकेशी संबंधित कामेही पूर्ण करावी लागतात. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात बँका कोणत्या दिवशी सुरू राहणार आणि कोणत्या दिवशी बंद असणार, हे जाणून घेणे ग्राहकांसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे ग्राहकांना नेहमीप्रमाणे बँकेतील कामे करता येतील.

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका बंद राहणार?

नोव्हेंबरमध्ये विविध सण, स्थानिक उत्सव आणि विशेष दिवसांमुळे काही राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे. त्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

  • 9 नोव्हेंबर: त्रिपुरा, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, सिक्कीम, मणिपूर, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड.

  • 10 नोव्हेंबर: गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड आणि सिक्कीम.

  • 11 नोव्हेंबर: सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेश.

  • 13 नोव्हेंबर: मेघालय.

  • 16 नोव्हेंबर: बिहार आणि झारखंड.

  • 20 नोव्हेंबर: उत्तराखंड.

  • 23 नोव्हेंबर: मेघालय.

  • 24 नोव्हेंबर: मिजोरम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, तेलंगणा, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर, नागालँड, पश्चिम बंगाल, नवी दिल्ली, छत्तीसगड, झारखंड आणि हिमाचल प्रदेश.

  • 27 नोव्हेंबर: कर्नाटक.aortic

रविवार आणि शनिवारच्या सुट्ट्या

नोव्हेंबरमध्ये 8, 15, 22 आणि 29 तारखेला रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील. तसेच 14 नोव्हेंबर हा दुसरा शनिवार आणि 28 नोव्हेंबर हा चौथा शनिवार असल्यामुळे या दिवशीही बँकांचे कामकाज होणार नाही.

बँका बंद असल्या तरी व्यवहार सुरू राहणार

बँकेला सुट्टी असली तरी ग्राहकांना UPI, मोबाइल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार करता येतील. तसेच ATM मधून पैसे काढण्याची सुविधाही सुरू राहील. मात्र, चेक जमा करणे, कागदपत्रांची पूर्तता करणे किंवा इतर शाखेशी संबंधित कामांसाठी बँकेच्या सुट्ट्यांची यादी आधी तपासून घ्या. ऐनवेळी गैरसोय टाळण्यासाठी बँकेत जाण्यापूर्वी आपल्या राज्यातील सुट्टीची माहिती नक्की तपासा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माणगावमध्ये सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता

Maharashtra Weather : ऑक्टोबर संपला तरी उन्हाळा पाठ सोडना! राज्यातील तापमानात वाढ, पहाटे हवेत गारवा; IMD चा मोठा इशारा

६१ तासांनंतर चक्काजाम आंदोलन स्थगित! राजू शेट्टींची मोठी घोषणा, ऊस दराबाबत अखेर तोडगा; पाहा शेतकऱ्यांना किती मिळणार?

दिवाळीत सोनं खरेदी करताय तर सावधान; ऐन सणासुदीत भेसळयुक्त सोन्याचा सुळसुळाट

राज्यात ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची लूट; 'साम'च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये लुटीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT