Bank Holiday November News AI Image
बिझनेस

Bank Closed : नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ४ दिवस बँका राहणार बंद, वाचा सुट्ट्यांची यादी

November Weekly Bnak Holiday Update News : नोव्हेंबर 2026 च्या शेवटच्या आठवड्यात 23 ते 29 नोव्हेंबरदरम्यान अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. वाचा बँकांच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी.

Alisha Khedekar

बँकेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी नोव्हेंबर महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची माहिती जाणून घ्या. कारण 23 ते 29 नोव्हेंबर 2026 या आठवड्यात देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँकांना सुट्ट्या असणार आहेत. सण, उत्सव आणि शनिवार-रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांमुळे काही दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांचे वेळापत्रक तपासणे महत्त्वाचे आहे.

सोमवारी 23 नोव्हेंबर रोजी मेघालयमध्ये सेंग कुट स्नेम या स्थानिक सणानिमित्त बँकांना सुट्टी असेल. त्यामुळे शिलाँगसह राज्यातील संबंधित भागांमध्ये बँकांच्या शाखा बंद राहतील. मंगळवारी 24 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा आणि रहस पौर्णिमा या सणांमुळे अनेक शहरांमध्ये बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. यामध्ये मुंबई, नवी दिल्ली, लखनऊ, जयपूर, भोपाळ, कोलकाता, चंदीगड, हैदराबाद, नागपूर, रांची, रायपूर, जम्मू, श्रीनगर, शिमला, कोहिमा, ऐझॉल आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे.

शुक्रवारी 27 नोव्हेंबर रोजी कनकदास जयंतीनिमित्त कर्नाटक राज्यात बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे बंगळुरूसह राज्यातील संबंधित भागांमधील बँकांच्या शाखा बंद राहतील. मात्र, इतर राज्यांमध्ये बँका नेहमीप्रमाणे सुरू असतील. शनिवार, 28 नोव्हेंबर हा महिन्यातील चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील. त्यानंतर 29 नोव्हेंबर रोजी रविवार असल्यामुळे पुन्हा एकदा बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

बँकेच्या शाखा बंद असल्या तरी ग्राहकांना अनेक ऑनलाइन सुविधा वापरता येतील. UPI, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि एटीएमद्वारे पैशांचे व्यवहार करता येतील. मात्र, चेक क्लिअरन्स आणि शाखेत जाऊन करावी लागणारी कामे सुट्टीच्या दिवशी होणार नाहीत. त्यामुळे चेक जमा करणे, महत्त्वाची कागदपत्रे देणे किंवा इतर बँकिंग कामे असल्यास ती वेळेत पूर्ण करून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washing Machine Vastu: घरात वॉशिंग मशीन कुठे ठेवताय? योग्य दिशा माहिती नाही? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

Bike Tyre Pressure: बाइकच्या पुढच्या टायरमध्ये किती PSI हवा असावी? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: मुंबईत उघड्यावर शेकोटी पेटवल्यास २ हजार दंड

पोहे बनवताना लिंबू कधी टाकावा?

Mumbai : मुंबईत उघड्यावर शेकोटी पेटवणे महागात पडणार! इतक्या रुपयांचा आकारणार दंड; प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT