Dominar 125cc Saam Tv
बिझनेस

Upcoming Bikes: 125cc सेगमेंटमध्ये बजाज घेऊन येणार जबरदस्त बाईक, लॉन्चआधी फोटो झाला लीक; जाणून संपूर्ण माहिती

Satish Kengar

Upcoming Bikes 2024:

तुम्हीही नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बजाज बाईक्स भारतीय ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. कंपनीच्या बाईक विक्रीत पल्सरचा दबदबा आहे. आता बजाज 125cc लाइनअपचा विस्तार करणार आहे.

बजाज पल्सर NS125 या सेगमेंटमध्ये आधीच विक्रीसाठी उपलब्ध आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता कंपनी बजाज डोमिनार 125cc लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. बजाज आधीपासूनच Dominar 250 आणि Dominar 400 विक्री करत आहे. यातच बजाजच्या अपकमिंग बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

125cc सेगमेंटमध्ये या बाईकचा दबदबा

जर आपण बजाज बाईकच्या विक्रीबद्दल बोललो तर कंपनी 125cc सेगमेंट आघाडीवर आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2024 मध्ये बजाज पल्सर बाईकच्या एकूण 1,12,544 युनिट्सची विक्री झाली होती. त्यापैकी 62,207 बाईक 125cc इंजिनांनी सुसज्ज होत्या.  (Latest Marathi News)

दुसरीकड या कालावधीत बजाज डोमिनार 250 ने 257 युनिट्सची तर डोमिनार 400 ने 441 बाईकची विक्री झाली होती. Rushlane या न्यूज वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, टेस्टदरम्यान बजाजच्या आगामी बाईकचे स्पाय शॉट्स लीक झाले आहेत. ही Bajaj Dominar 125 बाईक असू शकते, असा अंदाज आहे.

अलीकडेच लीक झालेल्या या बाईकच्या फोटोमध्ये बजाज पल्सर NS 125 प्रमाणे अलॉय व्हील, इंधन टाकी आणि टेल सेक्शन उपलब्ध आहेत. मात्र बाईकचा हेडलाइट डोमिनारसारखीच दिसते. जर Bajaj Dominar 125 लॉन्च झाली तर कंपनी त्याला सध्याच्या Pulsar NS125 च्या वर ठेवू शकते. बजाज जगभरात पल्सर ब्रँड अंतर्गत पल्सर एनएस लाइन आणि डोमिनार बाईक पल्सर ब्रँड अंतर्गत विकत आहे. असं असलं तर अद्याप आगामी बजाज डोमिनार 125 लॉन्च करण्याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

SCROLL FOR NEXT