Bajaj Chetak 3201 Special Edition Saam Tv
बिझनेस

Bajaj चा ग्राहकांना सुखद धक्का! 136Km रेंजसह नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Chetak लॉन्च; किंमत किती?

Bajaj Chetak 3201 Special Edition: बजाजने आपल्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचा स्पेशल एडिशन लॉन्च केला असून कंपनीने याचे नाव चेतक 3201 ठेवले आहे.

Satish Kengar

बजाज ऑटोने आपल्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचा स्पेशल एडिशन लॉन्च केला आहे. कंपनीने याचे नाव चेतक 3201 ठेवले आहे. पूर्ण चार्ज झाल्यावर ही स्कूटर 136 किमी धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. याची एक्स-शोरूम किंमत 1.30 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

ही किंमत EMPS-2024 योजनेनुसार आहे. ही प्रास्ताविक किंमत आहे, जी नंतर 1.40 लाख रुपये होईल. विशेष म्हणजे ग्राहकांना ही स्कूटर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून देखील खरेदी करू शकतात.

बजाज चेतक 3201 स्पेशल एडिशन स्कूटर त्याच्या टॉप-स्पेक प्रीमियम व्हेरिएंटवर आधारित आहे. कंपनीने याच्या लूकही बदल केला असून असून ही स्कूटर फक्त ब्रुकलिन ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. या स्कूटरच्या खास फीचर्सबद्दल सांगायचे तर, याला IP 67 रेटिंग मिळाले आहे. ज्यामुळे ते Water Resistance बनते. त्याचबरोबर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, चेतक ॲप, कलर टीएफटी डिस्प्ले इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटो हॅझार्ड लाईट यासारख्या फीचर्सचा यात समावेश करण्यात आला आहे.

कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. ही स्टील बॉडीसह येईल. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या स्पेशल एडिशनमध्ये साइड पॅनलवर 'चेतक' डिकल्स आहे. यात रियर व्ह्यू मिरर, सॅटिन ब्लॅक ग्रॅब रेल आणि हेडलॅम्प केसिंगला जुळणारा पिलियन फूटरेस्ट आणि चारकोल ब्लॅक फिनिश मिळतो.

फीचर्स

यात अलॉय व्हील, एलईडी लाइटिंग, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन, मेटल बॉडी पॅनल आणि आयपी67 वॉटरप्रूफिंग असलेली बॅटरी आहे. ब्रेकिंगसाठी दोन्ही बाजूला ड्रम ब्रेक बसवण्यात आले आहेत. यात टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, म्युझिक कंट्रोल्स, कॉल अलर्ट, फॉलो मी होम लाईट आणि ब्लूटूथ ॲप कनेक्टिव्हिटीसह रंगीत TFT डिस्प्ले आहे मिळेल.

यात 3.2kWh बॅटरी पॅक आहे, जो पूर्ण चार्ज केल्यावर 136Km ची रेंज देईल, असं कंपनीचं म्हणणं आहे. याला पूर्ण चार्ज होण्यासाठी 5.30 तास लागतात. हे सध्याच्या प्रीमियम मॉडेलच्या 127 किमीच्या रेंजपेक्षा जास्त आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 73kmph आहे. याची Ather Rizzta Z, Ola S1 Pro आणि TVS i-Cube सारख्या इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prem Birhade : लंडनच्या प्रेम बिऱ्हाडे प्रकरणात मोठा ट्विस्ट; पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापकाने केला मोठा खुलासा

Maharashtra Politics: संजय शिरसाट आणि संदीपान भुमरेंची गाडी कुणाच्या नावावर ? अंबादास दानवेंचा सवाल|VIDEO

ऐन दिवाळीत ठाकरेसेनेला खिंडार, जेष्ठ नेत्यानं असंख्य सहकाऱ्यांसह हाती घेतलं भाजपचं 'कमळ'

Bangladesh: आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग; धुराच्या काळोखात Airport गुडूप,धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT