Ayushman Card Saam tv
बिझनेस

Ayushman Card: आयुष्मान योजनेत ५ लाखांपर्यंत मोफत उपचार; वर्षातून किती वेळा घेता येतो लाभ?

Ayushman Card Rules: आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ५ लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. या योजनेत वर्षभरात तुम्ही किती वेळा लाभ घेऊ शकतात, कोणत्या आजारांवर उपचार घेऊ शकतात ते जाणून घ्या.

Siddhi Hande

आयुष्मान भारत योजना

५ लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार

वर्षभरातून किती वेळा घेऊ शकता लाभ?

केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे. आयुष्मान भारत योजनेत नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. या योजनेमुळे कोट्यवधी नागरिकांना फायदा निळणार आहे. या योजनेत ज्यांच्याकडे आयुष्मान कार्ड आहे त्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, या योजनेअंतर्गत वर्षभरात किती वेळा लाभ घेऊ शकतात ते जाणून घ्या.

आयुष्मान कार्ड आहे तरी काय? (What is Ayushman Card)

आयुष्मान कार्ड हे २०१८ मध्ये लाँच करण्यात आले होते. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत हे कार्ड जारी केले जाते. यामध्ये पात्र लाभार्थ्यांना सरकारी आणि प्रायव्हेट रुग्णालयात ५ लाखांपर्यंत मोफत इलाज करता येतात. हे आयुष्मान कार्ड तुम्ही ऑनलाइन पद्धतीने बनवू शकतात.

वर्षभरात किती वेळा घेऊ शकता लाभ? (How many times you get benefit of ayushman bharat scheme)

या योजनेत ५ लाखांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा ही संपूर्ण कुटुंबासाठी लागू असते. जर तुमच्या कुटुंबात ५-६ जण असतील तर त्यांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातील. दरम्यान, वर्षभरात तुम्ही कितीही वेळा उपचार करु शकतात यासाठी कोणतीही लिमिट नाही फक्त खर्च हा ५ लाखांपर्यंत जास्त नसावा.

कोणत्या आजारांवर उपचार घेऊ शकतात?

या योजनेअंतर्गत हॉर्ट वॉल्व रिप्लेसमेंट, पेसमेकर इम्प्लांट, प्रोस्टेट कॅन्सर, स्पाइन सर्जरी, स्कल बेस्ड सर्जरी, किडनी ट्रान्सप्लांट, कॉर्नियड ट्रान्सप्लांट या आजारांव तुम्ही उपचार घेऊ शकतात. यामध्ये तुम्हाला रुग्णालयात कोणत्याही प्रकारचे बिल द्यावे लागत नाही. आर्थिकदृष्ट्या कमजोर किंवा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना सुरु केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tata Sierra Booking Date: टाटाच्या नव्या SUV मॉडेलची किंमत आली समोर, बुकिंग डेट झाली फिक्स, वाचा फिचर्स

Castor Oil Benefits For Skin: सुंदर अन् मऊ त्वचेसाठी लावा एरंडेल तेल, आठवडाभरातच दिसेल मोठा फरक

Maharashtra Live News Update: धुळे शहरातील मोहाडी परिसरात 70 वर्षीय वृद्ध महिलेचा खून

"मी जिवंत आहे हो....!" सिद्ध करण्यासाठी वृद्धेची परवड; दहा लाख घेऊन मुलगा पसार

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹३००० कधी येणार? नोव्हेंबर-डिसेंबर हफ्त्याची संभाव्य तारीख समोर

SCROLL FOR NEXT