Ayushman Bharat Yojana saam tv
बिझनेस

Ayushman Bharat Yojana : आयुष्मान कार्ड असूनही रुग्णालय उपचार नाकारतंय? लगेच करा हे काम

Ayushman Card Free Treatment: आयुष्मान कार्ड असूनही रुग्णालय उपचार नाकारत असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

Sakshi Sunil Jadhav

Ayushman Card: केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना निर्धारित मर्यादेत सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार घेता येतात. पण आयुष्यान कार्ड असूनही एखादं रुग्णालय उपचार द्यायला नकार देत असेल, तर अशा परिस्थितीत काय करावं? तक्रार कुठे करायची आणि आपल्या शहरातल्या योजनेत असलेल्या रुग्णालयांची माहिती कशी मिळवायची, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

आयुष्मान कार्डवर कोणत्या रुग्णालयांत मोफत उपचार मिळतात?

तुम्ही आयुष्मान कार्डच्या माध्यमातून तुमच्या कार्डात सहभागी असलेल्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये पात्र उपचारांचा लाभ घेता येतो. पण सगळ्याच हॉस्पिटलमध्ये किंवा प्रत्येक आजारावर मोफत उपचार मिळतीलच असं नाही. संबंधित उपचार योजनेच्या नियमांमध्ये समाविष्ट असणं आणि रुग्णाची पात्रता पूर्ण असणं आवश्यक आहे.

आपल्या शहरातील रुग्णालय कसं तपासायचं?

आयुष्मान कार्डवर उपचार घेण्यासाठी रुग्णालय योजनेत नोंदणीकृत आहे की नाही, हे आधी तपासून घ्या. यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या अधिकृत हॉस्पिटल सर्च पोर्टलला भेट द्या. (https://hem.nha.gov.in/search ) या पोर्टलवर राज्य, जिल्हा, पिनकोड आणि इतर उपलब्ध पर्यायांच्या मदतीने आपल्या परिसरातल्या योजनेशी संलग्न रुग्णालयांची माहिती शोधता येते. रुग्णालयात जाण्यापूर्वी संबंधित उपचार योजनेअंतर्गत उपलब्ध आहेत का, याचीही खात्री करून घ्या.

रुग्णालय उपचार नाकारत असेल तर कुठे तक्रार कराल?

तुम्ही योजनेसाठी पात्र असाल आणि योजनेच्या नियमांनुसार समाविष्ट असलेले उपचार एखादं नोंदणीकृत रुग्णालय नाकारत असेल, तर तुम्ही तक्रार दाखल करू शकता.

यासाठी पुढील पर्यायांचा वापर करा:

१. राष्ट्रीय हेल्पलाइन १४५५५ - आयुष्मान भारत योजनेशी संबंधित तक्रार नोंदवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधा.

२. रुग्णालयाची माहिती द्या - रुग्णालयाचं नाव, पत्ता, रुग्णाची पात्रता, उपचाराचा प्रकार आणि उपचार नाकारल्याचं कारण याबाबत उपलब्ध माहिती सांगा.

३. कागदपत्रं जवळ ठेवा - आयुष्मान कार्ड, रुग्णालयातील कागदपत्रं, उपचारांचा अंदाज किंवा नकारासंबंधी उपलब्ध पुरावे तयार ठेवा.

४. तक्रारीचा क्रमांक जतन करा - तक्रार नोंदवल्यानंतर संदर्भ क्रमांक मिळाल्यास तो जतन करा, जेणेकरून पुढील कार्यवाहीची माहिती घेता येईल.

तक्रारीची चौकशी संबंधित यंत्रणेकडून केली जाऊ शकते. रुग्णालयाने योजनेच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळलं नियमानुसार कारवाई होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आता मी त्याला शोधायला चाललोय... 500 कोटींच्या ऑडिओ बॉम्बवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

5 Signs Of Dehydration In Body: तहान लागण्याची वाट पाहताय? शरीर आतून सुकत चालल्याचे सांगतात 'हे' ५ महत्त्वाचे संकेत

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली कुटुंबीयांची भेट

Maharashtra Politics: ठाण्यात राजकीय घडामोडींना वेग! भाजपचे सर्व नगरसेवक थेट शिंदेंच्या बंगल्यावर; उपमुख्यमंत्री शिंदे मोठा डाव टाकण्याच्या तयारीत?

रक्तदाब अचानक वाढल्यास शरीर देते हे 8 संकेत; जाणून घ्या वेळेत कसे ओळखायचे?

SCROLL FOR NEXT