Ayushman Bharat Yojana Saam Tv
बिझनेस

Ayushman Bharat: नागरिकांना मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार; आयुष्मान भारत योजनेचा लाभ कसा घ्यायचा?

Ayushman Bharat Yojana News: केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना राबवली आहे. या योजनेत नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत केली जाते. केंद्र सरकारची अशीच एक योजना म्हणजे आयुष्मान भारत.आयुष्मान भारत योजनेत नागरिकांना मोफत उपचार मिळतात.

आयुष्मान भारत योजनेत ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. यासाठी तुम्हाला आयुष्यमान कार्ड बनवावे लागणार आहे.

आयुष्मान भारत योजनेत नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. गरीब कुटुंबातील नागरिकांना या योजनेचा खूप फायदा होणार आहे. या योजनेत आतापर्यंत कोट्यवधी नागरिकांनी फायदा घेतला आहे.

आयुष्मान भारत योजनेत ५ लाखांचे कव्हरेज मिळते. सर्व वयोगटातील नागरिक या योजनेत लाभ घेऊ शकतात.

आयुष्मान कार्ड आहे तरी काय?

आयुष्मान कार्ड हे ओळखपत्र असते. आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हे कार्ड दिले जाते.जर तुम्ही प्रायव्हेट हेल्थ इन्श्युरन्समध्येही लाभ घेत असाल तरीही आयुष्मान योजनेचा लाभ घेऊ शकता.

अर्ज कसा करावा?

यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट https://abdm.gov.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.

ज्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याची आवश्यक कागदपत्रे वेरिफाय करा.

यानंतर कुटुंबाचे सर्टिफिकेट द्यावे लागणार. यानंतर संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे.

तुम्ही हे कार्ड प्रिंट करुन घेऊ शकतात.

रुग्णालयाची नावे

तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील रुग्णालयात जाऊन आयुष्मान योजनेअंतर्गत मोफत उपचार घेऊ शकतात.

यासाठी तुम्हाला www.pmjay.gov.in यावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर Empanelment Type वर क्लिक करा. यानंतर PMJAY वर क्लिक करा.

यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट रा.त्यानंतर तुम्हाला हॉस्पिटलची लिस्ट दिसेल.

यानंतर तुम्ही कॅशलेस उपचार घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT