Mumbai To Ayodhya Flights By Indigo 
बिझनेस

Mumbai To Ayodhya Flight: 'मायानगरी ते रामनगरी'; दिल्ली,अहमदाबादनंतर आता मुंबईहून 'ही' विमानसेवा सुरू

Ayodhya-Mumbai Air Tickets: इंडिगोने १५ जानेवारीपासून मुंबई ते अयोध्यादरम्यानची ही थेट विमानसेवा सुरू करणार असल्याचं सांगितलं आहे. मुंबई आणि अयोध्या दरम्यान दररोज उड्डाणे चालवली जातील.

Bharat Jadhav

Mumbai To Ayodhya Flights:

अयोध्येला जाण्यासाठी आता थेट मुंबईहून विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. दिल्ली आणि अहमदाबादनंतर आता मुंबईहूनही थेट विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. इंडिगोने १५ जानेवारीपासून मुंबई ते अयोध्यादरम्यानची ही थेट विमानसेवा सुरू करणार असल्याचं सांगितलं आहे. या दैनंदिन उड्डाणामुळे प्रवाशांना थेट अयोध्येला जाता येणार असल्याचं,एअरलाइन्सच्या अधिकाऱ्याने सांगितले.(Latest News)

याआधी इंडिगोने दिल्ली ते अयोध्येपर्यंत लवकरच होणार्‍या मर्यादा पुरुषोत्तम श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत उड्डाण केली जातील याची घोषणा इंडिगोच्या अधिकाऱ्याने केली होती. दरम्यान ६ जानेवारीपासून दिल्ली ते अयोध्या आणि ११ जानेवारीपासून अहमदाबाद ते अयोध्या अशी व्यावसायिक विमानसेवा सुरू होईल, असे एअरलाइनने म्हटलंय.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याविषयी बोलताना इंडिगोचे (Indigo) ग्लोबल सेल्स हेड (Global Sales Head) विनय मल्होत्रा ​​म्हणाले, ''दिल्ली आणि अहमदाबाद व्यतिरिक्त अयोध्या (Ayodhya) आणि मुंबई (Mumbai) दरम्यान थेट कनेक्टिव्हिटीची घोषणा करताना आम्हाला आनंद होतोय. या नवीन मार्गांमुळे या भागातील प्रवास, पर्यटन (tourist )आणि व्यापाराला लक्षणीय चालना मिळेल. आर्थिक विकासाला हातभार लावा आणि भारतातील तसेच परदेशातील ६E नेटवर्कद्वारे पर्यटकांना अयोध्येत जाता येईल.

इंडिगोने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मुंबई आणि अयोध्या दरम्यान दररोज उड्डाणे चालवली जातील. ही उड्डाणे १५ जानेवारीपासून सुरू होतील. मुंबईहून अयोध्येला जाणारे विमान दुपारी साडेबारा वाजता उड्डाण घेईल आणि १४.४५ वाजता अयोध्येला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासासाठी कंपनीचे विमान अयोध्येहून दुपारी ३.१५ वाजता उड्डाण भरेल आणि ५.४० वाजता मुंबईला उतरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचं, तर घरच्या घरी करुन लावा ही पेस्ट, आठवड्याभरात दिसेल फरक

Maharashtra Live News Update: गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग करणारे अखेर अटकेत

Wednesday Horoscope : मेष राशीसाठी संकष्ठीला लाभ, या राशींच्या नव्या संकल्पना यशस्वी होणार

Janhvi Kapoor: नवरी नटली! जान्हवी कपूरचा नवा ब्रायडल लूक पाहिलात का?

CP Radhakrishnan : सी. पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती; 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक

SCROLL FOR NEXT