new PUC rules for old and new vehicle saam tv
बिझनेस

PUC Rules : वाहनधारकांसाठी मोठी बातमी! PUC नियमांत मोठा बदल; जुन्या आणि नव्या वाहनांसाठी काय असणार नवी तरतूद

New PUC rules for old and new vehicles : केंद्र सरकारकडून वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या (PUC) वैधतेत मोठा बदल करण्यात आले आहे. यामध्ये नव्या आणि जुन्या वाहनांना कोणत्या कोणत्या तरतूद असणार आहेत याबद्दल सविस्तर जाणून घ्या.

Saam TV News

वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राबाबत (PUC) केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वाहनांचे वय आणि त्यांचे उत्सर्जन मानक (BS Norms) लक्षात घेऊन PUC प्रमाणपत्राच्या वैधतेमध्ये बदल करण्यात आला आहे. या नव्या नियमांमुळे कमी प्रदूषण करणाऱ्या नव्या BS-6 खासगी वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार असून, जुन्या वाहनांसाठी मात्र नियमित प्रदूषण तपासणी करणे आवश्यक असणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 13 नोव्हेंबर 2026 रोजी केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये सुधारणा करणारी अधिसूचना जारी केली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम 2026 अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे.

BS-VI खाजगी आणि व्यावसायिक वाहनांसाठी काय नियम आहेत?

  • नवीन नियमांनुसार, ६ वर्षांपर्यंतच्या BS-VI अनुरूप खाजगी वाहनांच्या पीयूसी (PUC) प्रमाणपत्राची वैधता ३ वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

  • ६ते १० वर्षांपर्यंतच्या जुन्या वाहनांना वार्षिक नूतनीकरणाची आवश्यकता असेल.

  • १० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना दर ६ महिन्यांनी PUCची आवश्यकता असेल.

  • BS-VI अनुरूप वाहतूक वाहनांसाठी ६ वर्षांपर्यंतच्या वाहनांकरिता वैधतेचा कालावधी २ वर्षे करण्यात आला आहे .

  • तसेच ६ ते १० वर्षांच्या वाहनांसाठी वार्षिक नूतनीकरण आणि १० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी दर ६ महिन्यांनी नूतनीकरण असेल.

BS-I मधून BS-IV मध्ये संक्रमण करण्यासाठी कालमर्यादा

जुन्या उत्सर्जन मानकांच्या (BS Norms) वाहनांसाठी प्रदूषण नियंत्रण उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या आहेत. याचे कारण असे की, नवीन नियमांनुसार, BS-IV वाहनांच्या PUC प्रमाणपत्राची वैधता ६ महिने निश्चित करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, जुन्या वाहनांमधून होणाऱ्या उत्सर्जनावर नियमित देखरेख सुनिश्चित करण्यासाठी, BS-I, BS-II आणि BS-III मानकांशी सुसंगत असलेल्या जुन्या वाहनांसाठी वैधता कालावधी केवळ तीन महिन्यांपर्यंत करण्यात आला आहे.

नूतनीकरण तारखेचे नियम कोणते

या अधिसूचनेत नूतनीकरण तारखेतही बदल करण्यात आला आहे. जर वाहन मालकाने PUC प्रमाणपत्राच्या मुदत समाप्तीच्या १० दिवसांच्या आत नूतनीकरणसाठी अर्ज केला, तर नवीन प्रमाणपत्र जुन्या प्रमाणपत्राच्या मुदत समाप्तीच्या तारखेपासून लागू होईल. तथापि, जर प्रमाणपत्राची मुदत संपल्यानंतर नूतनीकरण केले गेले, तर नवीन वैधता मुदत समाप्तीच्या तारखेपासून लागू होईल.

कोणाला होईल फायदा ?

हे नवीन नियम BS-VI वाहनांच्या मालकांसाठी वेळ आणि पैसा या दोन्हींची बचत करतील, विशेषतः अशा शहरांमध्ये जिथे कठोर PUC चाचणी आणि चलन प्रणाली लागू आहे तीथे याचा फायदा अधिक होईल.

टीप : वाहनधारकांनी आपल्या राज्यातील लागू अधिसूचना आणि परिवहन विभागाच्या अधिकृत सूचनांनुसार नियमांची खात्री करून घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरात ठाकरे गट आक्रमक; बाळासाहेबांच्या फोटोच्या कथित विटंबनेविरोधात निषेध आंदोलन

10 मिनिटांत सांगा! हत्तीच्या फोटोमध्ये एकूण किती प्राणी लपले आहेत?

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! पश्चिम द्रुतगती मार्गावर BMW ने महिलेला चिरडलं, जागीच मृत्यू

माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणाऱ्या आमदाराचं निधन; राजकारणात हळहळ

Lateef Bhatt : बाप शेतकरी, इंग्लिश मीडियममधून शिक्षण, सुतारकामातून ₹ १३००० कमावणारा लतीफ कसा झाला दहशतवादी?

SCROLL FOR NEXT