बिझनेस

Audi Cars: ऑडी खरेदी करणं झालं स्वस्त! GST बदलामुळे होणार पैशांची बचत, किंमत ऐकून व्हाल थक्क

Audi New Price: ऑडी भारतात लक्झरी कार विकते. जीएसटी दर कमी झाल्यानंतर कंपनीने काही मॉडेल्सच्या किमती कमी केल्या आहेत. आता या नव्या किमतीत कार कधी खरेदी करता येतील ते पाहूया.

Dhanshri Shintre

  • जीएसटी दर कपातीनंतर ऑडीने भारतात सर्व मॉडेल्सच्या किमती कमी केल्या.

  • ऑडी क्यू३, ए४, क्यू७ सह क्यू५, ए६ आणि क्यू८ वरही किंमतीत घट.

  • क्यू७ मॉडेलची किंमत तब्बल ६.१५ लाख रुपयांनी कमी झाली.

  • मर्सिडीज, टाटा, ह्युंदाई, महिंद्रा, स्कोडा आणि टोयोटानेही किंमतीत घट केली.

भारतामध्ये जीएसटी दरांमध्ये अलीकडेच झालेल्या बदलांनंतर सर्व वाहन उत्पादक त्यांच्या कारच्या किमती कमी करण्याच्या दिशेने पाऊल उचलत आहेत. या पार्श्वभूमीवर लक्झरी वाहन निर्माता ऑडीनेही त्यांच्या कारच्या किमती कमी केल्याची घोषणा केली आहे.

ऑडीच्या अधिकृत माहितीप्रमाणे, कंपनीने सर्व मॉडेल्सच्या किमती कमी केल्या आहेत. ऑडी क्यू३ ची किंमत ३.०७ लाख रुपये, ऑडी ए४ ची किंमत २.६४ लाख रुपये, तर ऑडी क्यू७ ची किंमत ६.१५ लाख रुपये कमी करण्यात आली आहे. याशिवाय ऑडी क्यू५, ऑडी ए६ आणि ऑडी क्यू८ या मॉडेल्सच्या किमतींमध्येही घट केली गेली आहे.

ऑडीला आशा आहे की या किमतींमध्ये झालेल्या घटीनंतर सणासुदीच्या काळात अधिकाधिक ग्राहक कार खरेदी करतील. कंपनीने सांगितले आहे की, ज्यांना त्यांच्या पसंतीच्या कारची नेमकी किंमत जाणून घ्यायची असेल, ते जवळच्या ऑडी शोरूममध्ये भेट देऊ शकतात किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर अद्ययावत किंमती पाहू शकतात.

केंद्र सरकारने जीएसटी कौन्सिलच्या अलीकडील बैठकीत वाहनांवरील जीएसटी स्लॅब बदलण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर बहुतेक वाहन उत्पादकांनी आपल्या कारच्या किमतीत घट केली आहे. ऑडी व्यतिरिक्त मर्सिडीज बेंझ, ह्युंदाई, टाटा, महिंद्रा, स्कोडा आणि टोयोटा या अनेक प्रमुख वाहन उत्पादकांनीही त्यांच्या कारच्या किमती कमी केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोकुळचा मोठा निर्णय! लवकरच चीज अन् आईस्क्रीम बाजारात आणणार; शेतकऱ्यांनाही दिलासा

Maharashtra Live News Update: मतचोरी करून भाजप सत्तेत; माजी मंत्री महादेव जानकर यांचा आरोप

देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांचा सिंचन घोटाळा लपवला, PM मोदींनी दिला पाठिंबा, मुख्य अभियंताचे गंभीर आरोप |VIDEO

Pimpri Chinchwad : गणेशोत्सवात लेझर बीम लाईटचा वापर, डीजेचा दणदणाट; पिंपरी चिंचवडमधील ४० मंडळांवर कारवाई

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात ही एक वस्तु दान करा; पैशांची तंगी आणि पितृदोष होतील दूर

SCROLL FOR NEXT