ATM Card Safety Tips Saam Tv
बिझनेस

ATM Card Safety Tips : एक चूक अन् बँक खातं होईल रिकामं; एटीएम वापरताना काय काळजी घ्याल?

ATM Card Scam : . एटीएम कार्ड चोरीला गेले किंवा हॅक झाले तर काय कराल?

कोमल दामुद्रे

ATM Security :

सध्या डिजिटल बँकिंगचा काळ असला तरीही एटीएममधून आजही पैसे काढले जातात. बँकेत जमा असलेली रोख रक्कम काढण्यासाठी एटीएमचा वापर केला जातो. ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे.

वाढत्या डिजिटलाझेशनमुळे एटीएम कार्डचा जास्त प्रमाणात वापर होत आहे. त्यामुळे फसवणुकीच्या घटना देखील वाढत आहे. आपल्या एका चुकीमुळे स्कॅम आणि क्लोनिंगसारख्या गोष्टींना आपण बळी पडत आहोत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सायबर सिक्युरीटीने सांगितले की, एटीएम कार्ड आणि डेबिट कार्ड वापरताना आपण क्लोनिंग आणि स्कॅमिंगला बळी पडू शकतो. एटीएम कार्ड हॅक करण्यासाठी पहिली गरज लागते ही स्किमरची. एटीएम मशीनमध्ये स्किमर स्वाइप मशीन बसवले जाते. कार्ड स्वाइप केल्यानंतर ते एटीएम मशीनमध्ये क्लोनिंग (कॉपी)केले जाते. यामुळे हॅक करणाऱ्या व्यक्तीला तुमच्या कार्डची सगळी माहिती कॉपी करता येते.

तुमच्या एटीएम कार्डची (ATM Card) माहिती कॉपी झाल्यानंतर हॅकर्स कोणत्याही ठिकाणावरुन तुमच्या खात्यातून सहज पैसे काढू शकतो. स्कॅमर्स चुबकीय पट्टीतून तुमचा क्रेडीट कार्ड क्रमांक, पिन, CVV डेटा कॉपी करु शकतो. ज्यामुळे ते पॉइंट ऑफ सेल (पीओएस)टर्मिनल्स किंवा एटीएमशी जोडता येईल. त्यासाठी एटीएम वापरताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

1. एटीएम वापरताना काय काळजी घ्याल?

  • पैसे (Money) काढायला जाताना एटीएम मशीनवरील कार्ड स्लॉट तपासा.

  • जर सैल किंवा तुटलेले असेल तर त्यात कार्ड घालू नका.

  • जर स्लॉट जवळील हिरवी लाइट पेटली नाही तर समस्या असू शकते.

  • जेव्हा तुम्ही पासवर्ड (Password) टाकाल तेव्हा कीपॅड तुमच्या हातांनी झाकून ठेवा.

2. एटीएम कार्ड चोरीला गेले किंवा हॅक झाले तर काय कराल?

  • एटीएम कार्ड हॅक झाल्यास तीन दिवसात बँकेकडे तक्रार करा.

  • एकदा बँकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमचे पैसे 90 दिवसांच्या आत तुमच्या खात्यात परत केले जातील.

  • फसवणूक झाल्यास, पोलिस स्टेशनमध्ये जा आणि एफआयआर नोंदवा.

  • खात्यात काही तफावत असल्यास, बँकेला कॉल करा आणि कार्ड ब्लॉक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

SCROLL FOR NEXT