X Subscription Plan : X यूजर्ससाठी धक्का! पोस्ट करण्यासाठी मोजावे लागणार पैसे, सब्सस्क्रिप्शन प्लान येणार

X Subscription Plan Price : ट्विटर (X) नवीन वापरकर्त्यांसाठी प्रति वर्ष $ 1 सदस्यता शुल्क आकारण्याची तयारी केली आहे.
X Subscription Plan
X Subscription Plan Saam Tv
Published On

X Not A Bot Plan:

अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांनी मागच्या वर्षी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक बदल केले आहेत. एलन मस्क यांनी सर्वात आधी ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नाव बदलले.

त्यांनी ट्विटरचे नाव बदलून एक्स केले. पण आता ट्विटर (X) नवीन वापरकर्त्यांसाठी प्रति वर्ष $ 1 सदस्यता शुल्क आकारण्याची तयारी केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. नेमंक काय खास?

गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. मात्र आता एलन मस्क यांनी याला दुजोरा दिला आहे. कंपनीच्या नफ्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे असं कंपनीने म्हटले आहे. आता X वर पोस्ट करण्यासाठी देखील पैसे आकारले जातील. यापुढे ट्विटरवर (X )मोफत मिळणार नाही.ज्यामध्ये पोस्ट (Post), रिपोस्ट, बुकमार्कसाठी वापरकर्त्यांना वर्षाभरासाठी किमान १ डॉलर इतकी किंमत (Price) मोजावी लागणार आहे .

जर तुम्हीचे ट्विटरवर आधीपासून अकाउंट असेल तर भारतात (India) प्रीमियम प्लानची ​​किंमत ६५० रूपये आहे. ट्विटर म्हणजेच 'x'नं एका पोस्टमध्ये म्हटले आहे की , १७ ऑक्टोबर २०२३ पासून आम्ही 'Not a Bot'च्या नवीन सबस्क्रिप्शनची चाचणी सुरू केलीय. X वर सुमारे २० ते ३० लाख फेक अकाउंट आहेत. त्यामुळे स्पॅम वापरकर्ते कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे स्कॅमर आणि बॉट्स दूर करण्यात मदत करेल. यासाठी कंपनीने ही योजना आणली आहे. मात्र ही बातमी समोर आल्यापासून सोशल मीडियावर लोक X (ट्विटर) बद्दल नाराजी व्यक्त करत आहेत.

X Subscription Plan
Railway Interesting Fact : स्टेअरिंग नसतानाही ट्रेन कशी वळते? लोको पायलट नक्की काय करतात?

जर ट्विटरच्या वापरकर्त्यांना हे वापरायचे नसेल तर ते फॉलोअर्स फक्त पोस्ट आणि फॉलो करू शकतील. म्हणजेच ब्लू टिकनंतर आता मस्कने पुन्हा एकदा वापरकर्त्यांना धक्का दिलाय. यासाठी मस्कने न्यूझीलंड आणि फिलिपाइन्समध्ये या चाचणीसाठी सुरूवातही केली आहे. जेव्हापासून इलॉन मस्कने ट्विटरसाठी सशुल्क ब्लू टिक योजना आणली तेव्हापासून त्याचे वापरकर्ते कमी होताना दिसून आले. त्यामुळे 6 महिन्यांत अनेक वापरकर्त्यांनी ट्विटर सोडले आहे. त्यामुळे या नव्या संकल्पेमुळे या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com