Atal Pension Yojana  Canva
बिझनेस

Atal Pension Yojana: महिन्याला फक्त ४२ रुपये गुंतवा अन् ५००० रुपयांची पेन्शन मिळवा; या योजनेत मिळतो सर्वाधिक परतावा

Atal Pension Scheme: अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेत तुम्हाला रोज ७ रुपयांची गुंतवणूक करायची आहे.

Siddhi Hande

फक्त ७ रुपयांची गुंतवणूक करा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा

अटल पेन्शन योजनेत सरकार देते गॅरंटी

अटल पेन्शन योजनेत कमी गुंतवणूकीत चांगला रिटर्न मिळतो

प्रत्येकाने आपल्या भविष्यासाठी योग्य गुंतवणूक करणे गरजेचे आहे. आपल्या कमाईतील थोडी रक्कम दर महिन्याला बाजूला काढून खूप गरजेचे आहे. दरम्यान, हे पैसे तुम्ही चांगल्या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला सुरक्षित परतावा मिळेल. दरम्यान, अटल पेन्शन योजना ही अशीच एक आहे. या योजनेत तुम्हाला खूप कमी गुंतवणूकीत चांगला परतावा मिळणार आहे.

अटल पेन्शन योजनेत आतापर्यंत जवळपास ७ कोटी नागरिकांनी लाभ घेतला आहे. या योजनेत तुम्हाला चहापेक्षाही कमी रुपयांची गरज भासणार आहे. तुम्ही फक्त ७ रुपयांची गुंतवणूक करुन तुम्ही चांगला परतावा मिळू शकतात. या योजनेत तुम्ही गॅरंटीड पेन्शन मिळते.

अटल पेन्शन योजनेत तुम्हाला दर महिन्याला ५००० रुपयांची पेन्शन मिळेल. या योजनेत पैसे गुंतवून तुम्ही तुमच्या सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगू शकतात.

अटल पेन्शन योजनेत तुम्हाला पेन्शनवर सरकार स्वतः गॅरंटी देते. या योजनेत तुम्ही दर महिन्याला १००० ते ५००० रुपयांची पेन्शन मिळवू शकतात. तुम्ही रोज किती पैसे गुंतवतात यावर तुम्हाला किती पेन्शन मिळणार हे ठरवता येणार आहे.

१८ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या योजनेत जर तुम्ही २० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील नागरिकांनी गुंतवणूक केली तर ४० वर्षांपर्यंत चांगली गुंतवणूक होईल. जर तुम्ही ४० वयोगटातील उमेदवारांनी गुंतवणूक केली तर ६० वर्षांनंतर तुम्हाला पेन्शन मिळणार आहे.

दररोज फक्त ७ रुपये गुंतवा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा

या योजनेत पती-पत्नी दोघेही मिळून १० हजार रुपयांनी पेन्शन मिळवू शकतात. या योजनेत तुम्ही दररोज ७ रुपये गुंतवणूक करु शकतात. या योजनेत महिन्याला २१० रुपये गुंतवणूक करुन महिन्याला ५००० रुपयांची पेन्शन मिळवू शकतात. जर तुम्हाला दर महिन्याला १००० रुपये हवे असेल तर महिन्याला ४२ रुपये गुंतवायचे आहेत.

या योजनेत कोण अर्ज करू शकतो?

१८ ते ४० वयोगटातील भारताचे नागरिक अटल पेन्शन योजनेत अर्ज करू शकतात.

योजनेत दररोज किती गुंतवणूक करावी लागते?

या योजनेत दररोज फक्त ₹7 पासून गुंतवणूक सुरू करता येते.

पेन्शन किती मिळते आणि केव्हा सुरू होते?

६० वर्षांनंतर दरमहा ₹१००० ते ₹५००० पर्यंत पेन्शन मिळते. रक्कम गुंतवणुकीनुसार ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WiFi Internet Tips : फक्त १ काम करा, घरातलं वायफाय धावेल बुलेटच्या स्पीडनं!

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांकडून शहरात नाकाबंदी!

Vande Bharat Train : झणझणीत मिसळ अन् चविष्ट पुरणपोळी, आता वंदे भारतमध्ये मराठमोळं जेवण

Early cancer symptoms: कॅन्सरचा धोका कसा ओळखाल? ही ८ लक्षणं वारंवार देतात संकेत, दुर्लक्ष करू नका!

Nidhhi Agerwal : संतापजनक! धक्काबुक्की अन् गैरवर्तन केले; अभिनेत्रीला चाहत्यांकडून वाईट वागणूक, VIDEO पाहून राग अनावर होईल

SCROLL FOR NEXT