कोण आहेत अरविंद श्रिनावास?
३१ व्या वर्षी उभारली कोट्यवधींची संपत्ती
२१,१९० कोटी रुपयांचे मालक
काल M3M Hurun India Rich List 2025 ची यादी जाहीर झाली. यामध्ये अनेकांचा अब्जावधींच्या यादीत समावेश आहे. यामध्ये चेन्नईतील अरविंद श्रिनिवास यांचाही समावेश झाला आहे. त्यांनी वयाच्या ३१ व्या वर्षी अब्जाधीशांच्या यादीत समावेश केला आहे. ते भारतातील सर्वात श्रीमंतांपैकी एक आहेत. श्रिनिवास Perplexity AIचे को फाउंडर आणि सीईओ आहेत. त्यांची संपत्ती जवळपास २१,१९० कोटी रुपये आहेत.
Hurun च्या या रिपोर्टनुसार, अरविंद श्रिनिवास यांनी अब्जाधीशांच्या यादीत समावेश केला आहे. त्यामुळे भारत देश हा प्रोडक्ट किंवा सर्व्हिसपुरता मर्यादीत नसून आता टेक्नोलॉजीमध्येही प्रगती केली आहे. अरविंद श्रिनिवास यांनी स्वतः च्या मेहनतीवर कोट्यवधि रुपये कमावले आहेत. त्यांनी स्वतः असं AI मॉडेल बनवले आहे. ज्यामुळे त्यांचे जगभरात नाव झाले आहे.
अरविंद श्रीनिवास आहेत तरी कोण?
अरविंद श्रीनिवास यांनी ७ जून १९९४ रोजी IIT मद्रास येथून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये ड्युअल डिग्री प्राप्त केली. यानंतर त्यांनी रिइन्फोर्समेंट लर्निंगमध्ये अॅडव्हान्स कोर्स केला.त्यानंतर त्यांनी UC Berkeley मध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी केली. यामध्ये रिइन्फोर्समेंट लर्निंग, इमेज जनरेशन ट्रान्सफॉर्मर आधारित मॉडेलवर काम केले. त्यांनी सुरुवातीला OpenAI, Google आणि DeepMind मध्ये काम केले. यानंतर त्यांनी स्वतः ची कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी Perplexity AI ची स्थापना केली. हे प्लॅटफॉर्म हजारो युजर्स वापरतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.