बिझनेस

Arattai App UPI: अरत्ताई अ‍ॅपवर लवकरच UPI सपोर्टसह होणार, जाणून घ्या खास फीचर्स

Zoho Corporation: झोहो कॉर्पोरेशनचे श्रीधर वेम्बू विकसित केलेले स्वदेशी चॅटिंग अ‍ॅप 'अरत्ताई' चर्चेत आहे. व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देणारे हे अ‍ॅप आता यूपीआय सुविधा आणण्याच्या तयारीत असून वेम्बूने माहिती दिली.

Dhanshri Shintre

स्वदेशी मेसेजिंग अ‍ॅप अरत्ताईबाबत एक नवा आणि महत्त्वपूर्ण विकास समोर आला आहे. झोहो कॉर्पोरेशनचे सह-संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी मंगळवारी सकाळी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये जाहीर केले की टीम अरत्ताई आता अ‍ॅपमध्ये मेसेजिंगसाठी थेट उपलब्ध होणाऱ्या यूपीआय पेमेंट फीचरवर काम करत आहे. या संदर्भात अरत्ताईची चर्चा आयस्पर्टचे शरद शर्मा यांच्याशी सुरू असल्याचे वेम्बू यांनी सांगितले. शरद शर्मा हे यूपीआयसाठी तांत्रिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

वेम्बू यांनी त्यांच्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की ते यूपीआयचे मोठे चाहते आहेत आणि असे तंत्रज्ञान शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचावे अशी त्यांची इच्छा आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले की त्यांचा उद्देश कोणत्याही प्रकारची बाजारातील मक्तेदारी निर्माण करण्याचा नाही, तर एक अधिक मुक्त आणि स्पर्धात्मक इकोसिस्टम तयार करण्याचा आहे. याचदरम्यान, यूजर्सचा अनुभव अधिक सुलभ आणि उपयुक्त करण्यासाठी अरत्ताईत यूपीआय पेमेंट्स समाविष्ट करण्याचा भर दिला जातो आहे.

मेटाच्या मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आधीच यूपीआय पेमेंट सुविधा उपलब्ध आहे. यूजर्स त्यामध्ये बँक खाते लिंक करून नंबर, UPI आयडी किंवा QR कोडच्या माध्यमातून सहजपणे व्यवहार करू शकतात. आता अरत्ताईसुद्धा या शर्यतीत उतरल्यामुळे अ‍ॅप दरम्यान अधिक तगडी स्पर्धा दिसण्याची शक्यता आहे.

अरत्ताईची लोकप्रियता अचानक उंचावली होती, जेव्हा केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या अ‍ॅपबाबत एक पोस्ट केली होती. त्यानंतर अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरील सोशल नेटवर्किंग श्रेणीत अरत्ताईने प्रथम क्रमांक पटकावला. अरत्ताईनेही याबाबत एक्स प्लॅटफॉर्मवरून माहिती दिली होती.

या अ‍ॅपचे नाव “अरत्ताई” हा तमिळ शब्दावरून घेतले गेले असून त्याचा हिंदीत अर्थ आहे ‘संभाषण’. २०२१ मध्ये लाँच झालेल्या या अ‍ॅपने आजवर फक्त अँड्रॉइड प्ले स्टोअरवरच दहा लाखांहून अधिक डाउनलोड्सची नोंद केली आहे. अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर मोबाईल नंबर टाकून ओटीपीद्वारे ते सुरू करता येते. त्याची लॉगिन प्रक्रिया आणि सोय व्हॉट्सअ‍ॅपसारखीच आहे.

अरत्ताईत अनेक वैशिष्ट्ये आधीपासूनच उपलब्ध आहेत, ज्यात ‘मीटिंग’ ऑप्शन विशेष उल्लेखनीय आहे. यात वापरकर्ते केवळ चॅटच नव्हे तर नवीन मीटिंग्ज तयार करणे, सामील होणे किंवा शेड्यूल करणे अशा सुविधा उपभोगू शकतात. यामध्ये आता यूपीआय पेमेंट्सची भर पडल्यास अरत्ताईला स्थानिक बाजारपेठेत अधिक बळकटी मिळेल आणि जागतिक स्तरावरही त्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: दसऱ्याला बुध-गुरूची युती होणार, ३ राशींवर परिणाम, खिशात राहणार पैसाच पैसा

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, तरुणीला रस्त्यावर लाथांनी बेदम मारहाण | VIDEO

Zubeen Garg Death Case : गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; मॅनेजर अन् महोत्सव आयोजकाला अटक

Facebook New Feature: सोशल मीडिया क्रिएटर्ससाठी खुशखबर! फेसबुकच्या नव्या फीचरने वाढेल कमाई

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

SCROLL FOR NEXT