Made in India Iphones Saam Tv
बिझनेस

Apple चा मोठा प्लान, भारतात दरवर्षी 5 कोटीहून अधिक iPhones बनवणार कंपनी

Apple चा मोठा प्लान, भारतात दरवर्षी 5 कोटीहून अधिक iPhones बनवणार कंपनी

Satish Kengar

Made in India Iphones:

अॅपलने अनेकवेळा चीन देशाच्या बाहेर आयफोन तयार करण्याचा विचार केला आहे. आता अॅपलच्या या यादीत भारताचाही समावेश झाल्याचे दिसत आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, अॅपल आपल्या पुरवठादारांसह पुढील 2-3 वर्षांत देशात दरवर्षी 5 कोटी (50 मिलियन) आयफोन बनवण्याची योजना आखत आहे. सूत्रांचा हवाला देऊन, न्यूज आउटलेटने सांगितले की, पुढील वर्षांमध्ये अतिरिक्त 10 लाख युनिट्स बनवण्याची कंपनीची योजना आहे.

Engadget च्या अनुसार, आयफोनच्या एकूण उत्पादनात याचा हिस्सा 25 टक्के असेल. यातच चीन iPhones पुरवठा साखळीतील सर्वात मोठा देश राहील आहे. फॉक्सकॉन आणि इतर अॅपल उत्पादन युनिट्सचा असा विश्वास आहे की, भारतात उत्पादन सुरु करण्याचं काम जोरात सुरु आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पायाभूत सुविधांची कमतरता आणि प्रतिबंधात्मक कामगार नियमांना धक्का देणाऱ्या प्रभावशाली संघटनांमुळे कंपनीची वाढ मंदावली होती. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या वर्षी जानेवारीत बदलाचे संकेत दिले होते. मात्र, याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी कोणतीही टाइमलाइन शेअर केली नाही. (Latest Marathi News)

फॉक्सकॉन कर्नाटकमध्ये एक मोठे उत्पादन युनिट उघडेल, जे एप्रिल 2024 पासून कार्यरत होईल. Apple ने यावर्षी देशात लॉन्चच्या दिवशी इतिहासात पहिल्यांदा भारतीय बनावटीचा iPhone 15 रिलीज केला आहे.

यापूर्वी, भारतातील आयफोन उत्पादन चीनच्या तुलनेत नऊ महिन्यांनी मागे होते. त्याच महिन्यात उत्पादन सुरू झाल्यावर आयफोन 14 सह हे गणित बदललं आहे. तसेच, यामुळे iPhone 15 चे उत्पादन वाढले, कारण ते लॉन्चच्या दिवशी ऑफलाइन स्टोअरमध्ये उपलब्ध होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhangar Reservation : आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; सुसाईड नोट आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

Diwali 2025 Don't Do: लक्ष्मीपूजनच्या रात्री चुकूनही करू नका 'ही' कामं; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, नेमकं प्रकरण काय?

ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; पगार १.७७ लाख रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT