Anganwadi Recruitment 2025 google
बिझनेस

Anganwadi Recruitment 2025 : अंगणवाडीत तब्बल ९,९०० महिला पदांची मोठी भरती; अर्ज करण्यास सुरुवात

Women Empowerment : गुजरातमध्ये अंगणवाडी सेविका, मिनी वर्कर आणि तेडागर पदांसाठी तब्बल ९,९०० पदांची भरती जाहीर. पात्रता, मानधन, अर्ज प्रक्रिया व अंतिम तारीख जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

  • गुजरातमध्ये ९,९०० अंगणवाडी पदांची भरती फक्त महिलांसाठी सुरु आहे .

  • सेविका, मिनी वर्कर, तेडागर पदांसाठी वेगवेगळ्या पात्रता असणे आवश्यक आहे.

  • निवड प्रक्रिया फक्त गुणवत्ता यादीवर आधारित, परीक्षा नाही होणार.

  • ऑनलाईन अर्ज ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत e-hrms.gujarat.gov.in वर.

महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाने तब्बल ९,९०० पदांची भरती जाहीर केली असून यामध्ये अंगणवाडी सेविका, मिनी वर्कर आणि अंगणवाडी तेडागर (सहाय्यक) पदांचा समावेश आहे. देशभरातील महिलांचे व मुलांचे पोषण, आरोग्य आणि शिक्षण यासाठी काम करणाऱ्या अंगणवाडीत ही भरती केवळ रोजगाराची संधी नसून समाजासाठी योगदान देण्याची सुवर्णसंधी मानली जात आहे.

ही भरती फक्त महिलांसाठी खुली असून उमेदवाराने ज्या वॉर्ड किंवा परिसरातील अंगणवाडी केंद्रात पद रिक्त आहे, त्याच वॉर्ड किंवा परिसराचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. यासाठी वॉर्डचा ताबा प्रमाणपत्र आवश्यक असेल. अंगणवाडी सेविका आणि मिनी वर्करसाठी किमान शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण, तर तेडागर पदासाठी १० वी उत्तीर्ण आवश्यक आहे. सेविका आणि मिनी वर्करसाठी वयोमर्यादा १८ ते ३३ वर्षे असून तेडागर पदासाठी ती ४३ वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे.

मानधनाच्या बाबतीत, सेविका आणि मिनी वर्कर यांना दरमहा १०,००० रुपये, तर तेडागर पदासाठी ५,५०० रुपये मिळतील. निवड प्रक्रियेत कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत न घेता उमेदवारांची निवड केवळ शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्ता यादीवर आधारित केली जाईल. जिल्हास्तरीय निवड समित्या अंतिम यादी तयार करतील आणि प्रसिद्ध करतील.

तुम्ही e-hrms.gujarat.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरु शकता. जिल्हा व प्रभाग निवडल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जसे की पासपोर्ट फोटो, स्वाक्षरी, शैक्षणिक प्रमाणपत्रे व रहिवासी प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करावी लागतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट २०२५ आहे. उमेदवारांना शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नये आणि वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ही भरती गुजरातमध्ये सुरु आहे.

गुजरातमध्ये ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?

सेविका, मिनी वर्कर आणि तेडागर (सहाय्यक) पदांसाठी ही भरती आहे.

पात्रता काय आहे?

सेविका व मिनी वर्करसाठी १२ वी उत्तीर्ण, तेडागर साठी १० वी उत्तीर्ण आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया कशी असेल?

कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत नाही, निवड शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्ता यादीवर होईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

३० ऑगस्ट २०२५ ही अंतिम तारीख आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Flag History: तिरंग्याच्या इतिहासात दडलेली १० महत्त्वाचे तथ्य तुम्हाला माहित आहे का?

Mumbai Vada Pav: मुंबईत वडापाव विकणाऱ्या ताईचा नादखुळा, ५ भाषा खडाखड बोलते, सोशल मीडियावर एकच चर्चा

Tulja Bhawani Temple : गाभाऱ्याच्या पाहणीचा अहवाल राज्य पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द; शिखराबाबत लवकरच निर्णय

Congress setback : काँग्रेसला आणखी एक धक्का, ठाकरे भाजपच्या संपर्कात, विदर्भाचे राजकारण फिरणार!

PM Awas Yojana : घरकुलाचं काम झालं, पण पैसे द्यायला सरकारी अधिकाऱ्याची टाळाटाळ, 20 हजार रुपयांची मागितली लाच

SCROLL FOR NEXT