Gold Silver Price Today :  saam tv
बिझनेस

Gold Price Today: अक्षय्य तृतीयेला सोनं महागलं की स्वस्त झालं? खरेदीआधी किंमत घ्या जाणून

Akshaya Tritiya gold rate : अक्षय्य तृतीयेनिमित्त मुंबई, पुणे आणि जळगावमध्ये सोन्याच्या खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. सोन्याचे दर दीड लाखांच्या पुढे असतानाही ग्राहकांचा उत्साह कायम आहे.

Namdeo Kumbhar

संजय महाजन | जळगाव प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी

Akshaya Tritiya gold price today Maharashtra Mumbai Pune Jalgaon : आज अक्षय्य तृतीया! साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या या सणाचे औचित्य साधून मुंबई, पुण्यासह जळगावकरांनी सराफ बाजारात सोने खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. जळगावमधील सराफा बाजारात आज २२ कॅरेट सोन्याची किंमत १३९९६५ रूपये प्रति तोळा (जीएसटीशिवाय) इतकी होती. तर चांदीची किंमत प्रति किलो २ लाख ६० हजार रूपये इतकी आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा एक लाख ५२ हजारांच्या पुढे आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा दिवस अत्यंत शुभ मानला जात असल्याने या दिवशी अनेक जण सोनं खरेदीला पसंती देतात. त्यामुळेच आजचा दिवस ग्राहकांबरोबरच सराफ व्यावसायिकांसाठी देखील लगबगीचा ठरला आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते, अशी जनभावना आहे. याच श्रद्धेपोटी आज जळगावच्या सराफ बाजारात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येक जण आपापल्या बजेटनुसार, 'फूल ना फुलाची पाकळी' म्हणून थोड्या प्रमाणात का होईना, सोने खरेदी करताना दिसून आला.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याकडे नागरिकांचा मोठा कल दिसून येत आहे. मात्र, यंदा या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे.

आजचे दर :

सोने: १ लाख ५७ हजार रुपये (GST सह)

चांदी: २ लाख ६७ हजार रुपये (GST सह)

गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ झाल्याने यंदा ग्राहकांच्या संख्येवर काहीसा परिणाम झाल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दरात तब्बल ५७ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल १ लाख ६३ हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यात जर युद्धविरामाची घोषणा झाली नाही आणि जागतिक परिस्थिती अशीच राहिली, तर येणाऱ्या काळात सोन्याचे दर दोन लाखांपर्यंत, तर चांदी तीन लाखांचा आकडा पार करू शकते, असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT