Akshaya Tritiya Gold Rate Akshaya Tritiya Gold Rate
बिझनेस

Akshaya Tritiya Gold Rate : अक्षय्य तृतीयेनिमित्त सोनं खरेदी करताय? वाचा तुमच्या शहरातील नवे दर

Gold Silver Price Hike : अक्षय्य तृतीयेनिमित्त आज सोने तसेच चांदीचे दर काय आहेत? मुंबई आणि पुण्यातही सोनं कालच्यापेक्षा आज महागलं आहे का? या सर्वांची माहिती जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

अक्षय्य तृतीयेनिमित्त आज सकाळपासूनच सोनाराच्या दुकानात गर्दी उफाळली आहे. नागरिक सोने आणि चांदी खरेदीसाठी घराबाहेर पडले आहेत. गेल्या महिन्यात सोन्याच्या दरांत कमालीची वाढ झाली होती. त्यानंतर हळूहळू दर कमी होताना दिसले. अशात आज अक्षय्य तृतीयेनिमित्त सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत.

त्यामुळे तुम्ही देखील आज सोने खरेदी करण्याचा विचार केला असेल, तर आजचा भाव काय आहे ते जाणून घ्या. आज सोनं ८५० रुपयांनी महागलं आहे. तर चांदीची किंमत १,३०० रुपये प्रति किलोने वाढली आहे.

चांदीच्या किंमती

आज चांदीच्या दरांमध्ये प्रति किलो १,३०० रुपयांची वाढ दिसतेय. काल ८५,२०० रुपये प्रति किलो असलेली चांदी आज ८६,५०० रुपये प्रति किलो भावाने विकली जात आहे.

मुंबईमध्ये चांदीची किंमत ८६,५०० प्रति किलो. चेन्नईमध्ये ९०,००० प्रति किलो, नवी दिल्लीत ८६,५०० रुपये प्रति किलो आणि कोलकत्तामध्ये देखील ८६,५०० रुपये प्रति किलो चांदीचे दर आहेत. पुण्यात चांदी ८६,५०० रुपये प्रति किलो आहे.

सोन्याच्या किंमती

अक्षय्य तृतीयेनिमित्त सोन्याचे दर (Gold Price) देखील वाढले आहेत. आज २२ कॅरेट सोनं ८५० रुपयांनी महागून ६७,१५० रुपये प्रति तोळा भावाने विकलं जात आहे. तर २४ कॅरेट सोनं ९३० रुपयांनी महागलं असून प्रति तोळा ७३,२४० रुपये किलोने विकलं जात आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव ६९० रुपयांनी महागला आहे. त्यामुळे सोनं ५४,९४० रुपये प्रति तोळा आहे.

मुंबई आणि पुण्यातील सोन्याच्या किंमती

मुंबईत २२ कॅरेट ६७,०००, २४ कॅरेट ७३,०९०, १८ कॅरेट ५४,८२० रुपये प्रति तोळ्याने विकलं जात आहे. तर पुण्यात २२ कॅरेट ६७,०००, २४ कॅरेट ७३,०९०, १८ कॅरेट ५४,८२० रुपये प्रति तोळ्याने विकलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT