Electric Vehicle Saam Tv
बिझनेस

Affordable Electric Vehicle: इलेक्ट्रिक कार घ्यायचा विचार करताय? स्वस्तातल्या 5 सर्वात बेस्ट EV

Electric Vehicle: भारतात इलेक्ट्रिक कारची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. नवनवीन इलेक्ट्रिक कार बाजारात लाँच होत आहेत. आज आपण ५ बजेट फ्रेंडली ईव्हीबद्दल जाणून घेऊया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Best Electric Car Under 10 Lakh:

भारतात इलेक्ट्रिक कारची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. नवनवीन इलेक्ट्रिक कार बाजारात लाँच होत आहेत. नुकतीच टाटा पंच इलेक्ट्रिक कारचे अनावरण करण्यात आले आहे. ही कार लाँच होण्याची अनेकजण वाट पाहत होते. टाटा पंचसोबतच टाटाच्या अनेक इलेक्ट्रिक कार बाजारात आहेत. या कारबद्दल जाणून घेऊया. (Latest News)

Tata Tiago EV

टाटाची Tata Tiago EV लोकप्रिय आहे. कंपनीची ही हॅचबॅक कार XE, XT, XZ+ आणि XZ+ Tech Lux या चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये 19.2 kWh आणि 24 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही कार 315 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. या कारच्या बेस मॉडेलची किंमत ८.६९ लाख रुपये आहे. या कारमध्ये अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, रियर व्ह्यू कॅमेरा आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम हे फिचर्स देण्यात आले आहे. टाटाची ही ५ सीटर कार आहे.

Citroen eC3

Citroen eC3 ही कार ११.६१ लाख रुपयांना विकली जात आहे. कारचे टॉप मॉडेल १२.९९ लाख रुपये आहे. या नवीन कारमध्ये 10.2 इंच टचस्क्रिन सिस्टीम आहे. एका चार्जमध्ये ही कार 320 किमी पर्यंतची रेंज देते. या कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध आहे. ही कार 29.2 kWh बॅटरीसह सादर केली जात आहे.

Tata Tigor EV

Tata Tigor EV ही ५ सीटर कार आहे. या कारच्या बेस मॉडेलची किंमत १२.४९ लाख रुपये आहे. ही कार ३१५ किमी ड्रायव्हिंग रेंज देते. या कारमध्ये 26kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे.

MG Comet EV

MG Comet EV ही कार सिंगल चार्जमध्ये 230kmपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. यात 41bhp पॉवर देण्यात आली आहे. या कारच्या बेस मॉडेलची किंमत ७.९८ लाख रुपये आहे. MG Comet EV कारमध्ये 17.3kWhचा बॅटरी पॅक आहे. ही बॅटरी 111Nm टॉर्क जनरेट करते.

Tata Nexon EV

टाटाची ही नवीन कार क्रिएटिव्ह+, फियरलेस, फियरलेस+, फियरलेस+एस, एम्पॉवर्ड आणि एम्पॉवर्ड+या सहा प्रकारांमध्ये येते. या कारची एक्स शोरुम किंमत १४.७४ लाख रुपये आहे. या एसयूव्ही कारमध्ये १६ इंची अलॉय व्हिल देण्यात आले आहे. या कारमध्ये 30kWh बॅटरी आहे. ही कार 127bhp पॉवर आणि 465 ड्रायव्हिंग रेंज देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Meditation: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दिवाळीतल्या दिव्यांचा करा वापर, वाचा तज्ज्ञ काय म्हणाले

Pimpari Crime News : पिंपरी पोलिसांचा गुन्हेगारांना दणका! अल्पवयीन मुलांकडून बंदूक आणि काडतुसे केली जप्त, नेमकं काय घडलं?

IND vs AUS: रविवार असूनही सकाळी लवकर उठलो, पण...; ८ आणि ० वर बाद होणाऱ्या रोहित-विराटचे मीम्स व्हायरल

Viral Video: किळसवाणा प्रकार! रेल्वेमध्ये वापरतायत खरकटे प्लेट्स अन् डबे; VIDEO व्हायरल

Raj Thackeray: राज ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडओ'; म्हणत दाखवला नरेंद्र मोदींचे ते भाषण|VIDEO

SCROLL FOR NEXT