Adani Group : अदानींना मोठा झटका, नेटवर्थमध्ये १२ अब्ज डॉलरची घट saam tv
बिझनेस

Adani News : अदानींना मोठा झटका, १२ अब्ज डॉलर गमावले, नेटवर्थमध्ये घसरगुंडी

Adani Group stocks : अदानी समूहावर अमेरिकी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर गौतम अदानींना जबरदस्त झटका बसला आहे. त्यांच्या संपत्तीत जवळपास १२ अब्ज डॉलरची घट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Saam Tv

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अदानींवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच, मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी अदानी समूहावर अमेरिकी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप करण्यात आल्यानं शेअर बाजारात खळबळ उडाली. यानंतर गौतम अदानींचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या संपत्तीत जवळपास १२ अब्ज डॉलरची घट झाल्याचे वृत्त आहे.

फोर्ब्ज रिअल टाइम बिलेनियर इंडेक्समध्ये अदानी १७ व्या स्थानांवरून २५ व्या स्थानी घसरले आहेत. अब्जाधीशांच्या यादीतलं त्यांचं स्थान घसरलं आहे. आता त्यांच्याकडील नेटवर्थ ५७.४ अब्ज डॉलर इतके आहे.

शेअर बाजारात अदानी ग्रुपचे शेअर धडामधूम

अदानी समूहावर झालेल्या आरोपांनंतर अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. अदानी एन्टरप्रायझेस, अदानी पोर्ट्समध्ये १५ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. अदानी पॉवरचे शेअर जवळपास १३ टक्क्यांनी कोसळले आहे. तर अदानी ग्रीन एनर्जी १७, अदानी एनर्जी सॉल्यूशनच्या शेअर्समध्ये साधारण २० टक्क्यांची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

एसीसीच्या शेअर्समध्ये १२.७५ टक्क्यांची घसरण, अंबुजा सिमेंटमध्ये १० टक्क्यांपर्यंत लोअर सर्किट लागले आहे. अदानी विल्मरचे शेअर्स ९.३१ टक्क्यांनी घसरले आहेत. त्याचा एकंदरीत परिणाम हा गौतम अदानी यांच्या एकूण नेटवर्थवर झालेला दिसून येत आहे.

काय आहे आरोप?

अमेरिकेच्या सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने (SEC) अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांच्यावर अमेरिकी गुंतवणूकदारांना फसवणे आणि सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात त्यांचे निकटवर्तीय, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे अधिकारी आणि एज्योर पॉवर ग्लोबल लिमिटेडचे काबेनेस यांच्यावर देखील आरोप केले आहेत.

एसईसीच्या तक्रारीनुसार, ज्यांच्यावर आरोप केले आहेत, ते सर्व फेडरल सिक्योरिटीज कायद्यामधील भ्रष्टाचारविरोधी तरतुदींचं उल्लंघन करत होते, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT