Adani Group 
बिझनेस

Adani Group: अदानीने $600 दशलक्ष बाँड इश्यू केला रद्द, अदानी समूहावर वाढले बँकांचे कर्ज

उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. अमेरिकेत कथित $250 दशलक्ष फसवणूक आणि लाचखोरी प्रकरणात गुंतल्याचा आरोप झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

Dhanshri Shintre

उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. अमेरिकेत कथित $250 दशलक्ष फसवणूक आणि लाचखोरी प्रकरणात गुंतल्याचा आरोप झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. गौतम अदानी यांच्यावर फसवणुकीच्या आरोपानंतर अदानींच्या शेअर्सवरही परिणाम झाला आहे. सकाळी शेअर बाजार उघडताच त्यांचे शेअर्स 20 टक्क्यांनी घसरले. त्यामुळे शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. शेअर बाजार रोजप्रमाणे गुरुवारी उघडला. पण आज शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली.

सेन्सेक्स-निफ्टी उघडताच कोसळला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स लाल रंगात उघडला आणि काही मिनिटांतच 400 अंकांनी घसरून 77,110 च्या पातळीवर पोहोचला. ज्यामध्ये विशेषत: अदानीचे शेअर्स 20 टक्क्यांनी घसरले. अदानी ग्रीन एनर्जी (20%), अदानी एनर्जी सोल्यूशन्स (20.00%), अदानी पॉवर (13.75%), अदानी पोर्ट्स (10.00%), अदानी विल्मार (9.51%) कमी होते. याशिवाय अदानी एंटरप्रायझेसचे शेअर 10%, अदानी टोटल गॅस 14.70%, ACC लिमिटेड 14.35%, अंबुजा सिमेंट्स 10.00% आणि NDTV शेअर 12.29% ने घसरले.

अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी आणि इतर सात जणांवर $2 अब्ज डॉलरची फसवणूक आणि लाचखोरी घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ज्यामध्ये असा आरोप आहे की, समूहाने अब्जावधी डॉलर्सचा नफा मिळविण्यासाठी सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना $265 दशलक्ष लाच दिली.

भारतीय बँकांसोबतच अदानी समूहाने जागतिक बँकांकडून कर्ज घेतले आहे. मार्च २०२४ अखेर, विदेशी बँकांनी अदानी समूहाला ₹ ६३,२९६ कोटी कर्ज म्हणून दिले होते. एक वर्षापूर्वी म्हणजेच मार्च २०२३ मध्ये हे कर्ज ६३,७८१ कोटी रुपये होते. मार्च 2024 पर्यंत, समूहाने ग्लोबल कॅपिटल मार्केट्सकडून ₹७२,७९४ कोटी कर्ज घेतले होते. अदानी समूहाच्या एकूण कर्जापैकी ९२% म्हणजेच २ लाख २२ हजार कोटी रुपये दीर्घकालीन कर्ज म्हणून घेतले गेले आहेत. दीर्घ मुदतीच्या कर्जाची परतफेड कालावधी १ वर्षापेक्षा जास्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT