Share Market News: गौतम अदानींची संकटांची मालिका सुरूच, शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड
अदानी समूहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स 600 अंकांनी पडला आहे. तर निफ्टीसुद्धा 208 अंकांनी पडली आहे. अदानी यांच्यावर झालेल्या आरोपानंतर न्यूयॉर्कमध्ये जे घडलं त्यानंतर आता त्याचेच परिणाम म्हणून शेअर मार्केटमध्ये ही मोठी घसरण बघायला मिळत आहे.
गौतम अदानी यांची संकटांची मालिका सुरूच आहे. आता त्यांच्या समूहावर अमेरिकेत गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. न्यूयॉर्क येथील न्यायालयात अदानी यांच्यासह सात लोकांवर 21 अब्ज, 10 कोटी, 83 लाख, 25 हजारांची लाच देण्याचा आणि फसवणुकीचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर अदानी समूहाने मात्र याबाबत एक निवेदन जारी करून हे सर्व आरोप खोटे असल्याचं म्हणत सर्व आरोपांच खंडन केलं आहे. यासगळ्या प्रकारानंतर आता शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स 600 अंकांनी पडला आहे. निफ्टीसुद्धा 208 अंकांनी पडली असल्याचं बघायला मिळालं आहे.
यासंदर्भात भाष्य करताना साम टीव्हीचे मुख्य संपादक नीलेश खरे यांनी म्हंटलं आहे की, अदानी समूहाच्या अनेक मोठ्या कंपन्या आहे ज्या सेन्सेक्स आणि निफ्टीचा भाग आहेत. मात्र सध्या जि पडझड झाली आहे ती केवळ 1 टक्क्यांची आहे. साधारणत: 3 टक्क्यांच्यावर अंकांची पडझड होते, तेव्हा शेअर बाजार कोसळला असं म्हणता येतं. त्यामुळे याचा फार काही परिणाम शेअर बाजारावर होणार नाही आहे. ही पडझड केवळ अदानी समूहापूरती मर्यादित राहणार आहे. त्यामुळे उर्वरित शेअर मार्केटवर याचा फारसा परिणाम दिसणार नाही, असं त्यांनी म्हंटलं आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.