Aadhaar -PAN Link News Saam Tv
बिझनेस

Aadhaar-Pan Link: आधार-पॅन कार्ड आताच करा लिंक, फक्त ६ दिवसांचा वेळ; स्टेप बाय स्टेप प्रोसेस करा फॉलो

Aadhaar Pan Link Process: आधार-पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. यासाठी शेवटच्या ६ दिवसांची मुदत उरलेली आहे. तुम्ही तर मुदतीआधी आधार पॅन लिंक केले नाही तर अनेक अडचणी येऊ शकतात.

Siddhi Hande

आधार-पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य

आधार पॅन लिंक न केल्यास पॅन कार्ड होणार बंद

आधार आणि पॅन कार्ड लिंक कसे करायचे?

आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. तुमचे पॅन कार्ड बंद केले जाईल. यामुळे तुम्ही ३१ डिसेंबरपूर्वी तुम्हाला हे काम करायचे आहे. अन्यथा करदात्यांना अनेक अडचणी येऊ शकतात.

आधार आणि पॅन कार्ड हे दोन्ही महत्त्वाचे कागदपत्र आहे. आयटीआर फाइल करताना, बँकेत अकाउंट उघडताना आधार कार्ड आणि पॅन कार्ड गरजेचे आहे. त्यामुळे हे काम आताच करा. शेवटचे ६ दिवस उरले आहेत.

पॅन कार्ड होणार बंद

जर तुम्ही आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुम्हाला आयकर रिफंड मिळणार नाही. यामुळेच केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने निर्देश जारी केले आहेत.ज्या लोकांनी आधार रजिस्ट्रेशन नंबरद्वारे पॅन कार्ड काढले आहे. त्यांना आधार पॅन लिंक करायचे आहे.

आधार पॅन लिंक करण्याची ऑनलाइन प्रोसेस (How to Link Aadhaar-Pan Card)

सर्वात आधी तुम्हाला आयकर विभागाची वेबसाइट www.incometax.gov.in वर लॉग इन करायचे आहे.

यानंतर तुम्हाला क्विक लिंक्स या सेक्शनमध्ये लिंक आधार असा ऑप्शन दिसणारआहे.

यानंतर तुमच्या स्क्रिनवर नवीन विंडो ओपन होणार आहे. त्यात तुम्ही पॅन, आधार आणि मोबाईल नंबर टाका.

यानंतर I validate my Aadhaar Details वर क्लिक करा.

यानंतर तुमच्या फोनवर ओटीपी येईल. तो टाकावा.

यानंतर तुम्हाला पुन्हा व्हॅलिडेट करायचे आहे. यानंतर तुमचे आधार पॅन लिंक होणार आहे. तुम्हाला यासाठी १००० रुपये शुल्क भरायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT