Aadhar Card Scam
Aadhar Card Scam Saam TV
बिझनेस

Aadhar Card Scam : आधारकार्ड तुम्हाला आणू शकतं अडचणीत, धोका टाळण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

Ruchika Jadhav

How to protect yourself :

आज भारतात प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड आहे. आधार कार्डवर आपली संपूर्ण माहिती असते. आज प्रत्येक कामात आधार कार्ड विचारले जाते. काही महत्वाच्या गोष्टी विकत घेताना, सरकारी योजनांचा लाभ घेताना आपल्याला आधारकार्ड विचारले जाते. आधारकार्ड नसल्यास आपली कामे रखडतात.

बऱ्याच ठिकाणी आधारकार्ड स्कॅन केले जाते. अशावेळी समोरील संस्थेने आपल्या माहितीची गोपनीयता ठेवणे गरजेचे असते. मात्र बऱ्याच ठिकाणी आपल्या माहितीचा गैरवापर केला जातो. आजवर सायबर क्राईमच्या अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. आपल्याला एखादे सीमकार्ड विकत घ्यायचे असेल तेव्हा देखील आधार कार्ड गरजेचे असते.

आधार कार्ड चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागले तर मोठे संकट येऊ शकते. आपल्या आधार कार्डवर जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने सिम कार्ड खरेदी केले आणि त्यावरून ती व्यक्ती काही चुकीची कामे करत असेल. तर अशावेळी कारवाईमध्ये सर्वात आधी तुमचे नाव समोर येईल. तसेच गुन्हा करणारी व्यक्ती पसार होईल आणि तिच्यापर्यंत पोहचणे तुम्हाला कठीण होईल.

त्यामुळे तुमच्या आधारकार्डचा वापर करून किती व्यक्तींनी आपल्या नावाने सीमकार्ड खरेदी केलं आहे हे आजच माहीत करून घ्या. त्यासाठी पुढे दिलेल्या टिप्स फॉलो करा.

1 सर्वात आधी गूगल क्रोम ओपन करा. त्यावर tefcof सर्च करा. ही भारत सरकारची दूरसंचार वेबसाईट आहे.

2. या साईटवर आल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा फोन नंबर विचारला जाईल. तिथे तुम्ही वापरत असलेला आणि आधारकार्डला लिंक असलेला नंबर टाका.

3. त्यानंतर हा नंबर सेव्ह करा. पुढे तुम्हाला कॅपचा दिसेल तो भरा.

4. कॅपचा भरल्यावर एक ओटीपी येईल. आलेला ओटीपी देखील भरा.

5. अशा पद्धतीने लॉगिन केल्यावर तुम्हाला अनेक नंबरची लिस्ट दिसेल.

6. हे सर्व नंबर तपासून घ्या. यातील जो फोन नंबर तुमचा नसेल त्यावर नॉट माय नंबर या पर्यायावर क्लिक करा.

7. त्यानंतर पुढे रिपोर्टवर क्लिक करा. 2 ते 3 तासाने तुमची रिपोर्ट केलेला नंबर बंद झाल्याचा तुम्हाला मॅसेज येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Silver Rate Hike : सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; वाचा महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील आजचा भाव

Nashik Loksabha: मतदानाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस अलर्ट; तब्बल ३ हजार ५१८ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

Sangali News: सांगली, पुण्यासह ५ रेल्वेस्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी; संशयित आरोपीला मुंबईतून अटक

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट; एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला, घरांची पडझड VIDEO

Virat Kohli Crying : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली रडला; अनुष्कालाही फुटला अश्रूंचा बांध, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT