Aadhaar mobile number update now possible using biometric verification without documents. Saam Tv
बिझनेस

Aadhaar Card Update: कोणत्याही फॉर्म किंवा कागदपत्राशिवाय आधार कार्ड होईल अपडेट; जाणून घ्या प्रक्रिया

Aadhaar Card Update: आता कोणत्याही फॉर्म किंवा कागदपत्रांशिवाय आधार मोबाईल नंबर अपडेट करता येणार आहे. आयपीपीबीची बायोमेट्रिक सेवा काही मिनिटांत आधार अपडेट करता येते.

Bharat Jadhav

  • आधार मोबाईल नंबर अपडेट करणे आता खूप सोपे झाले

  • कोणताही फॉर्म किंवा कागदपत्र न लागता अपडेट शक्य

  • फक्त बायोमेट्रिक फिंगरप्रिंटद्वारे प्रक्रिया पूर्ण

आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र बनलंय. पण जेव्हा मोबाईल नंबर बदलण्याचा किंवा अपडेट करण्याचा प्रश्न येतो तेव्हा बहुतेक लोकांसाठी ही प्रक्रिया खूपच त्रासदायक वाटत असते. आता आधारमध्ये मोबाईल नंबर अपडेट करणे खूप सोपे झाले आहे. आयपीपीबीच्या नवीन सुविधेमुळे बायोमेट्रिक फिंगरप्रिंटद्वारे मोबाईल नंबर काही मिनिटांत अपडेट करता येतो. यासाठी कोणत्याही फॉर्म किंवा कागदपत्राची गरज राहत नाही.

आधार मोबाईल नंबर फक्त फिंगरप्रिंटद्वारे होईल अपडेट

तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक India Post Payments Bank (IPPB) ने आधारमध्ये तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी, जलद आणि पूर्णपणे पेपरलेस केली आहे. या नवीन सुविधेअंतर्गत तुम्हाला कोणतेही फॉर्म भरण्याची, ओळखपत्र देण्याची किंवा कोणतेही छायाचित्र किंवा कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाहीये. फक्त एक बायोमेट्रिक फिंगरप्रिंट तुमचा नवीन मोबाइल नंबर तुमच्या आधारशी त्वरित अपडेट केला जाईल.

आयपीपीबीची ही सुविधा केवळ शहरांपुरती मर्यादित नाहीये. ग्रामीण भागातही ही सुविधा पोहोचलीय. तुम्ही गावात राहता किंवा शहरात राहत असला तरी तुमचा आधार मोबाईल नंबर अपडेट करणे काही मिनिटांचे काम आहे. या प्रक्रियेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो १००% पेपरलेस आहे. तुम्हाला कोणतेही फॉर्म भरण्याची, कोणतेही कागदपत्रे सादर करण्याची किंवा कोणतेही प्रिंटआउट जवळ बाळगण्याची आवश्यकता नाहीये.

तुमच्या जवळच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या शाखेला किंवा पोस्ट ऑफिसला भेट द्या. ग्रामीण भागात ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्रामीण डाक सेवक (GDS) तुमच्या घरी येऊन ही सेवा देऊ शकतो. तुम्हाला फक्त तुमचा आधार क्रमांक आणि नवीन मोबाईल नंबर द्यावा लागेल. तुमची ओळख फिंगरप्रिंट बायोमेट्रिक्सद्वारे पडताळली जाईल. ही संपूर्ण केवायसी प्रक्रिया आहे - कोणतेही फॉर्म नाहीत, कागदपत्रे नाहीत, फोटो लागत नाहीत.

एकदा बायोमेट्रिक्स जुळले की, तुमचा नवीन मोबाईल नंबर तात्काळ आधारमध्ये अपडेट केला जातो. अपडेट पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाईल फोनवर एक पुष्टीकरण एसएमएस देखील पाठवला जातो. आयपीपीबीची ही सेवा नाममात्र शुल्कात उपलब्ध आहे. कोणतेही अतिरिक्त किंवा लपलेले शुल्क नाहीत. ही नवीन सेवा विशेषतः ज्यांचा जुना मोबाईल नंबर बंद झाला आहे किंवा बराच काळ वापरात नाही अशा लोकांसाठी फायदेशीर ठरतेय.

जर मोबाईल नंबर वापरात नसेल तर आधारशी संबंधित ओटीपी येत नाहीत. बऱ्याचवेळी आपल्या आधारवरील नंबर बंद होऊन जातो. किंवा मोबाईल हरवल्यानंतर बँकिंग, डीबीटी, सिम पडताळणी आणि सरकारी योजनांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळा येत असतो. आयपीपीबीची त्वरित मोबाइल अपडेट सुविधा अशा सर्व वापरकर्त्यांसाठी एक वरदान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मोहाडी तालुक्यात तरुणाची निर्घृण हत्या, २५ वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह

Lung inflammation symptoms: फुफ्फुसांना सूज आल्यावर शरीरात ही लक्षणं दिसून येतात

Baby Food: १ वर्षापेक्षा लहान बाळांना देऊ नका हे २ पदार्थ! डॉक्टरांनी काय सल्ला दिला? वाचा...

Ghatkopar: घाटकोपरमध्ये तिरंग्यावरून वाद, दोन गटात तुंबळ हाणामारी; VIDEO व्हायरल

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन! चित्ररथातून घडवला गणेशोत्सवाचा अनुभव | VIDEO

SCROLL FOR NEXT