Aadhaar Card Saam Tv
बिझनेस

Aadhaar Card: आधार कार्डवरील नाव बदलायचंय? फक्त एका कागदपत्राने होईल काम; या स्टेप्स करा फॉलो

Aadhaar Card Update Process: आधार कार्ड हे दर दहा वर्षांनी अपडेट करायचे असते. जर तुम्ही आधार अपडेट केले नाही तर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात.

Siddhi Hande

प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. सर्व सरकारी कामांसाठी, बँकेच्या काही कामांसाठी आधार कार्ड हे गरजेचे असते. आधार कार्ड हे दर दहा वर्षांनी अपडेट करावे लागते. जर तुम्ही अपडेट केले नाही तर तुम्हाला अडचण येऊ शकते. (Aadhaar Card Update)

तुमच्या आधार कार्डवर नाव, पत्ता आणि तुमची माहिती असते. भारतीय ओळख प्राधिकरण विभाग तुमचे आधार कार्ड तयार करते. जर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरुन करु शकतात. तुम्ही आधार कार्डवरील नावदेखील बदलू शकतात.

आधार कार्डवर अनेकदा चुकीची माहिती असते. काही वेळाला तुमचे नाव चुकलेले असते. त्यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. परंतु तुम्ही फक्त एका कागदपत्राच्या आधारे नाव बदलू शकतात. (Aadhaar Card Update Process)

पॅन कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स,नरेगा कार्ड, सरकारी ओळखपत्र, फोटो, ईपीएफओ ओळखपत्र, यूआयडीएआय स्टँडर्ड सर्टिफिकेट फॉर्मॅटद्वारे दिलेले ओळखपत्र, बँक पासबुक, शाळेतील सर्टिफिकेट, स्कूल ट्रान्सफर सर्टिफिकेट, वीमा योजनाचे कागदपत्रे, जन आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, किसान कार्ड या कागदपत्रांच्या आधारे तुम्ही आधार कार्डवरील नाव बदलू शकतात.

तुम्ही ऑनलाइन पद्धतीने आधार कार्डवरील नाव बदलू शकतात. यासाठी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नाव बदलावे लागेल. त्यासाठी तुम्हाला वेबसाइटवर ऑप्शन येईल. तुम्हाला माहिती भरावी लागेल. त्यानंतर ७ दिवसांच्या आत तुमचे आधार कार्ड अपडेट होईल.तुम्ही १४ डिसेंबरपर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

Skip Lunch Effect: जेवण टाळणं म्हणजे आजारांना निमंत्रण? जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

Plastic surgery : कॅन्सरमुळे तरुणानं लिंग गमावलं, ८ वर्षांनी प्लास्टिक सर्जरीद्वारे लिंगाची पुनर्रचना, साडे ९ तास चाललं ऑपरेशन

SCROLL FOR NEXT