Aadhaar Card Update Saam Tv
बिझनेस

Aadhaar Card Update: आधार कार्डवरील नाव चुकलंय? किती वेळा करु शकता अपडेट; जाणून घ्या नियम

How Many Times You can Update Aadhaar: आधार कार्ड हे नागरिकांसाठी महत्त्वाचे कागदपत्रं आहे. तुम्ही किती वेळा आधार कार्ड अपडेट करु शकतात, जाणून घ्या.

Siddhi Hande

भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्रं आहे. प्रत्येक सरकारी कामासाठी किंवा महत्त्वाचे काही काम असेल तर आधार कार्ड हे लागतेच. आधार कार्डवर जर माहिती किंवा मोबाईल नंबर चुकीचा असेल तर त्यामुळे अनेक अडचणी येऊ शकतात.

आधार कार्डवर जर चुकीची माहिती असेल तर अनेक कामे होत नाही. त्यामुळे आधार कार्डवरील चुकीची माहिती बदलून घेणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला आधार कार्ड अपडेट करावे लागते.आधार कार्ड आपण किती वेळा अपडेट करु शकतो, याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

यूआयडीएआयकडून (UIDAI) आधार कार्ड जारी केले जाते. याचा उपयोग अगदी सिम कार्ड खरेदी करण्यापासून ते सरकारी कामे करण्यापर्यंत होतो. आधार कार्डच्या मदतीने तुम्ही पासपोर्टदेखील काढू शकता.

आधार कार्डवर (Aadhaar Card) तुम्ही जन्मतारीख, मोबाईल नंबर, पत्ता अपडेट करता येतो. तुम्ही माय आधार या वेबसाइटवरुन ऑनलाइन पद्धतीने अपडेट करु शकतात.सध्या तुम्ही कोणत्याही शुल्काशिवाय आधार कार्ड अपडेट करु शकतात.

आधार कार्ड अपडेट (Aadhaar Card Update)

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी काही मर्यादा आहेत. तुम्ही आधार कार्डवरील नाव फक्त दोनदा बदलू शकतात. यासाठी काही कागदपत्रे सादर करावी लागतील. तसेच पत्ता तुम्ही कितीही वेळा बदलू शकतात.

सरकारी नियमांनुसार १० वर्षे जुने आधार कार्ड अपडेट केले पाहिजे. तुम्ही १४ डिसेंबर २०२४ पूर्वी मोफत आधार कार्ड अपडेट करु शकतात. आधार कार्ड अपडेट करण्याची प्रोसेस ९० दिवसाची असते. आधार कार्ड अपडेटची विनंती ३० दिवसांच्या आता मंजूर केली जाते. त्यानंतर पुढच्या दोन महिन्यात आधार कार्ड अपडेट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Business Idea: कार नसतानाही करा OLA-Uberसोबत व्यवसाय; दरमहा कमवा बक्कळ पैसा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Banana Chips: वेफर्स खाताय सावधान! तुम्ही खाताय सडलेल्या केळीचे वेफर्स

Mumbai Ahmedabad Bullet Train: समुद्राखालून ३२० किमी वेगाने धावेल मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, जाणून घ्य कसा असेल मार्ग

Shocking : ३१ वर्षांच्या तरुणाने केली हद्दपार, १००० महिलांसोबत शरीरसंबध, पण आता...; जगभरात होतेय चर्चा

NEET Exam: 'नीट'चं टेन्शन, विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन; विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

SCROLL FOR NEXT