Banana Chips: वेफर्स खाताय सावधान! तुम्ही खाताय सडलेल्या केळीचे वेफर्स

Banana Chips Scam: तुम्ही जीभेचे चोचले पुरवण्यासाठी केळीचे वेफर्स आवडीने खात असाल तर सावधान. कारण तुम्ही वेफर्स नाही तर आजार विकत घेताय. ते नेमकं कसं? केळीचे वेफर्स किती किळसवाण्या पद्धतीने बनवले जात आहेत? पाहूयात.
Banana Chips
Rotten Bananas Chips: saam tv
Published On

केळीचे वेफर्स बनवणाऱ्या कारखान्यामधील ही दृश्य पाहून तुम्हाला किळस वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमच्या आवडीचे केळीचे वेफर्स, जे तुम्ही उपवासाच्या दिवशीही चवीने खात असता.. ते वेफर्स सडलेल्या केळ्यांपासून आणि खराब तेलात तळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नवी मुंबईतील शिळफाटा परिसरात हा प्रकार समोर आलाय.

सडलेल्या केळ्यांपासून वेफर्स बनवणाऱ्या या कारखान्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे नागरिकांनीही उघड्यावरील आणि पॅकेटबंद खाद्यपदार्थ खरेदी करताना काय काळजी घ्यायला हवी? पाहूयात.

Banana Chips
Viral News: रिल्स बनवणाऱ्यांना मिळणार 5 हजार रुपये, काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

वेफर्स खाताय सावधान!

अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाचा नंबर असलेले खाद्यपदार्थ खरेदी करा

बाजारातून वेफर्स खरेदी करताना पॅकिंगची तारीख बघावी.

पॅकेट उघडल्यानंतर वास येत असल्यास खाणं टाळा

अनोळखी किंवा लहान ब्रँड्सकडून खरेदी करताना अधिक दक्षता घ्यावी

पॅकेट फाटलेलं असेल तर ते खरेदी करू नका आणि निर्दशनास आणून द्या

दरम्यान मराठी कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर कोकण आयुक्त अन्न प्रशासन यांच्याकडून नवी मुंबईतील वेफर्सचा कारखाना बंद करण्यात आलाय. मात्र अनेक दिवसांपासून सडलेली आणि निकृष्ट दर्जाची केळी कारखान्यात वापरली जात असताना ही बाब FDA च्या लक्षात आली नाही का..? अशापद्धतीनं सडलेल्या केळीचे वेफर्स खाऊन नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com