Aadhaar Card Saam Tv
बिझनेस

Aadhaar Card: आधारकार्ड जन्मतारखेचा पुरावा नाही, मग कोणकोणती कागदपत्रे द्यावी लागणार?

Aadhaar Card Not Valid For DOB: आधार कार्ड आता यापुढे जन्मतारखेचा पुरावा मानला जाणार नाही. त्याऐवजी तुम्ही इतर कागदपत्रे पुरावा म्हणून वापरु शकतात.

Siddhi Hande

आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा नाहीच

आधार कार्डशिवाय ही कागदपत्रे वापरु शकतात

UIDAI ने दिली महत्त्वाची माहिती

आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्डशिवाय अनेक कामे होत नाही. अनेक सरकारी कामांसाठी आधार कार्ड गरजेचे आहे. दरम्यान, आता यूआयडीआयने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. आधार कार्ड हा तुमच्या जन्मतारखेचा पुरावा असू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जन्मतारखेचा पुरावा देण्यासाठी आधार कार्डचा वापर करु शकत नाही. व्हेरिफिकेशनसाठी आधारबाबत असलेला संभ्रम दूर करणे हा यामागचा उद्देश आहे.

जन्मतारखेसाठी आधार कार्ड वैध का नाही? (Aadhaar Card Not Valid for Date Of Birth Proof)

UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, आधारमध्ये दिलेली जन्मतारखेची माहिती ही स्वयं-घोषणापत्रावर आधारित असते. त्यामुळे या अशा प्रकरणांमध्ये व्यक्तीकडे अधिकृत कागदपत्रे नसतात. अशा परिस्थितीत जन्मतारीख ही कोणत्याही अंदाजावर काढलेली असू शकते. कोणताही अधिकृत पुरावा नसल्याने विश्वसनीयता कमी होते.

जन्मतारखेच्या पुराव्यासाठी ही कागदपत्रे वापरु शकतात (Date of Birth Proof Alternate Documents than Aadhaar Card)

UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, आता जन्मतारखेच्या पुराव्यासाठी आधार कार्ड ग्राह्य मानले जाणार नाही. परंतु काही कागदपत्रे पुरावा म्हणून मानले जातात.

  • १०वीची गुणपत्रिका

  • पासपोर्ट

  • अधिकृत प्राधिकरणाने जारी केलेले जन्म प्रमाणपत्र

ही कागदपत्रे जन्माच्या पुराव्यासाठी ग्राह्य धरली जाणार नाही.

ओळखपत्रासाठी आधार वॅलिड आहे का?

UIDAI ने ही माहिती दिल्यानंतर इतर कामांसाठीही आधार ग्राह्य धरले जाणार की नाही असा प्रश्न पडला आहे. मात्र, याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आधार हे सरकारी सेवा, बँक खाती, एलपीजी अनुदान आणि इतर योजनांसाठी महत्त्वाचे कागदपत्र म्हणून वापरता येणार आहे. आधार कार्ड हे तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी वापरु शकतात.

या नवीन अपडेटनंतर जन्मतारखेच्या पुराव्यासाठी आधार वापरु शकत नाही. यासाठी तुम्हाला पर्यायी कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. हा नवीन धोरणात्मक बदल नसून सर्व संस्थांमध्ये एकसमान अंबलबजावणीसाठी करण्यासाठी हे नियम जारी केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू; १२ गंभीर जखमी

Maharashtra News Live Update: लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारचा पुढाकार

Pune-Satara Travel : खंबाटकी घाट बोगद्यातील थरार संपला; पुणे-सातारा प्रवास सुसाट होणार, वाचा सविस्तर माहिती

Gold Rate Today: सोनं पुन्हा एकदा महागलं; चांदी मात्र स्थिर; वाचा आजचे २२ अन् २४ कॅरेटचे दर

Massajog Sarpanch : संतोष देशमुखांच्या पत्नीचा सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव, कोण झालं विजयी?

SCROLL FOR NEXT