Aadhaar Card Saam Tv
बिझनेस

Aadhaar New Rule: 'आधार कार्ड'वर सरकार आणखी मोठा निर्णय घेणार, फोटोकॉपी देण्यावर नियम येणार

Aadhaar Card Verification Rule Changes: आता आधार कार्डच्या नियमांमध्ये बदल केले जाणार आहे. तुम्हाला कुठेही आधार कार्डची फोटोकॉपी नेणे गरजेचे नाही. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने व्हेरिफिकेशन करु शकतात.

Siddhi Hande

आधार कार्डच्या नियमात बदल

आता ऑफलाइन पद्धतीने आधार कार्ड नेणे गरजेचे नाही

डिजिटल पद्धतीने होणार आधार कार्ड व्हेरिफिकेशन

सरकार आधार कार्डसंदर्भात नवीन नियम लागू करणार आहे. या नवीन नियमांनुसार, कोणत्याही हॉटेल किंवा कार्यक्रमात आधार कार्डची फोटोकॉपी द्यावी लागणार नाही. नागरिकांना हॉटेलमध्ये त्यांच्या आधार कार्डची कॉपी द्यावी लागणार नाही. सरकारच्या म्हणण्यानुसा, पेपर बेस्ड आधार व्हेरिफिकेशन हे कायद्याच्या विरोधात आहे. यामुळे प्रायव्हसीसंदर्भात अनेक अडचणी येऊ शकतात.

UIDAI ने यासाठी फ्रेमवर्क मंजूर केले होते. यानुसार जर एखाद्या संस्थेला ऑफलाइन पद्धतीने आधार व्हेरिफिकेशन करायचे असेल तर त्यासाठी यूआयडीएआयमध्ये रजिस्टर असणे गरजेचे आहे. तुम्ही क्यू आर कोड आणि अॅप बेस्ड व्हेरिफिकेशनचा वापर करु शकतात. हे नियम लवकरच लागू केले जाणार आहे.

नवीन नियमांनुसार, हॉटेल किंवा इव्हेंटसाठी सर्व संस्थांना UIDAI मध्ये रजिस्टर असणे गरजेचे आहे. यानंतर त्यांना API चा अॅक्सेस मिळणार आहे. यामुळे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड सबमिट करु शकतात.

नवीन अॅपवरुन करा आधार कार्ड व्हेरिफिकेशन

UIDAI लवकरच नवीन आधार अॅप लाँच करणार आहे. यासाठी टेस्ट सुरु आहे. यामुळे अॅप टू अॅप व्हेरिफिकेशन सुविधा मिळणार आहे. यामुळे एअरपोर्ट, रिटेल स्टोअर, हॉटेल किंवा इव्हेंटमध्ये आधार व्हेरिफिकेशन सोप्या पद्धतीने करता येणार आहे. अनेकदा सर्व्हर डाउन असल्याने व्हेरिफिकेशन होत नाही. परंतु या अॅप आधारित व्हेरिफिकेशनमुळे अनेक कामे सोपे होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेंदूची रक्तवाहिनी फुटल्यावर शरीरात अचानक दिसतात हे बदल

Bike Taxi: रॅपिडोसह ओलाविरोधात आणखी एक गुन्हा, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

पुण्यातील राजकारण फिरणार; भाजपविरोधात लवकरच 'लेटर बॉम्ब', पत्रात नेमकं कुणाचं नाव?

नागपुरात पुन्हा बिबट्याची दहशत; थेट घरातच शिरला|VIDEO

Pune Metro: २२ स्टेशन, पुण्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आरामदायी प्रवास, मेट्रो ४ बाबत महत्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT