Aadhaar Biometric Update For Children: Rules, Fee Waiver And Deadline  AI Image
बिझनेस

Aadhar Card : आधार कार्ड अपडेटबाबत महत्त्वाची बातमी; ३० सप्टेंबरपर्यंत बायोमेट्रिक अपडेट फ्री; कोणासाठी लागू आहे हा नियम? वाचा

Aadhar Card Update News : मुलांच्या आधार कार्डसाठी ५ आणि १५ वर्षांनंतर बायोमेट्रिक अपडेट आवश्यक आहे. ७ ते १५ वर्षांच्या मुलांसाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत शुल्कमाफीचा लाभ कसा घ्यायचा, जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • ५ आणि १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलांचे Mandatory Biometric Update करणे आवश्यक

  • बायोमेट्रिक अपडेटमध्ये फोटो, बोटांचे ठसे आणि Iris माहिती अपडेट केली जाते

  • ७ ते १५ वर्षांच्या मुलांसाठी सध्या बायोमेट्रिक अपडेट शुल्क माफ

  • ही सवलत ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत आहे

तुमच्या घरात लहान मूल असेल आणि त्याचे आधार कार्ड काढले असेल, तर पालकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAI च्या नियमांनुसार, मुलाचे वय ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणि त्यानंतर वयाची १५ वर्षे पूर्ण झाल्यावर Mandatory Biometric Update करणे आवश्यक असते. या प्रक्रियेत मुलाचा फोटो, बोटांचे ठसे आणि दोन्ही डोळ्यांच्या Iris ची माहिती अपडेट केली जाते.

३० सप्टेंबरपर्यंत विशेष सवलत

UIDAI च्या माहितीनुसार, ५ ते ७ वर्षे आणि १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचे Mandatory Biometric Update नियमानुसार मोफत केले जाते. याशिवाय, सध्या ७ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठीही बायोमेट्रिक अपडेटचे शुल्क माफ करण्यात आले आहे. ही सवलत ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत लागू आहे. त्यामुळे या वयातील मुलांचे अपडेट बाकी असल्यास पालकांनी मुदत संपण्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करणे फायदेशीर ठरणार आहे.

५ आणि १५ वर्षांनी अपडेट का आवश्यक?

लहान वयात आधार तयार करताना मुलाच्या बायोमेट्रिक माहितीऐवजी प्रामुख्याने फोटो आणि आवश्यक तपशील नोंदवले जातात. मात्र, मुलाचे वय ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याच्या बोटांचे ठसे, दोन्ही Iris आणि नवीन फोटो यांसह आवश्यक बायोमेट्रिक माहिती नोंदवली जाते. त्यानंतर १५ वर्षे पूर्ण झाल्यावर पुन्हा बायोमेट्रिक अपडेट केले जाते. महत्त्वाचे म्हणजे, या प्रक्रियेनंतर मुलाचा आधार क्रमांक बदलत नाही.

आधार कुठे अपडेट करायचा?

Mandatory Biometric Update करण्यासाठी मुलाला आधार नोंदणी केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे. पालक आधार क्रमांकासह जवळच्या Aadhaar Enrolment Centre ला भेट देऊन प्रक्रिया पूर्ण करू शकतात. जवळचे आधार केंद्र शोधण्यासाठी UIDAI च्या Bhuvan Aadhaar Portal ची मदत घेता येते. मुलांच्या शाळा, परीक्षा, शिष्यवृत्ती तसेच विविध सरकारी योजनांशी संबंधित कामांसाठी आधारचा वापर होत असल्याने बायोमेट्रिक माहिती वेळेत अपडेट करून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाच्या वयानुसार आधार अपडेट बाकी आहे का, हे तपासून घ्यावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई पोलीस दलात कोट्यवधींचा महाघोटाळा! थेट पोलिसांच्याच पगारावर मारला दरोडा; मुख्य सूत्रधार अखेर अटकेत

Maharashtra News Live Update: प्लास्टिकच्या कारखान्यात भीषण आग, आगीत काही कामगार अडकल्याची भीती

Gold Price Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचा ताजा भाव

Liver warning signs: लिव्हर खराब होण्यापूर्वी नखांवर दिसतात 3 संकेत; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

SCROLL FOR NEXT