Aadhaar Card Saam Tv
बिझनेस

Aadhaar Card Update: तुमचं आधार कार्ड १० वर्ष जुनं झालंय? १४ जूनपर्यंत मोफत करा अपडेट; सोपी प्रोसेस वाचा

Aadhaar Card Free Update: आधार कार्ड अपडेट करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही १४ जूनपर्यंत मोफत आधार अपडेट करु शकता. त्यानंतर तुम्हाला पैसे द्यावे लागतील.

Siddhi Hande

दर १० वर्षांची आधार अपडेट गरजेचे

१४ जूनपर्यंत मोफत करा आधार अपडेट

अन्यथा बँकेच्या, सरकारी कामांमध्ये येतील अडचणी

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्ड अपडेट करणे खूप गरजेचे असते. १० वर्षांनी आधार अपडेट करणे अनिवार्य आहे. तुमचेही आधार कार्ड १० वर्ष जुने असेल तर तुम्ही लगेच अपडेट करा. अन्यथा तुमची अनेक कामे होणार नाहीत.

आता तुम्हीही तुमचे आधार कार्ड अपडेट करु शकतात. दहा वर्षांपूर्वीचे आधार कार्ड कोणत्याही शुल्काशिवाय अपडेट करु शकतात. UIDAI ने आधार कार्डमधील ओळख आणि पत्ता अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही हे काम १४ जूनपर्यंत करु शकतात. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन अपडेट करायचं आहे.

आधारमधील माहिती अनेकदा बदलण्याची शक्यता जास्त असते. दहा वर्षात तुमचा पत्ता बदलू शकतो. तुमच्या चेहऱ्यात बदल होऊ शकतो. त्यामुळे अपडेट करणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही आधार अपडेट कले नाही तर सरकारी अनुदान बंद होऊ शकते.

आधार कार्ड अपडेट नसल्याने बँक केवायसीमध्ये प्रॉब्लेम होऊ शकते. त्यामुळेच दर दहा वर्षांनी आधार अपडेट करणे गरजेचे आहे. ही मोफत सेवा १४ जूनपर्यंत उपलब्ध आहे. त्यानंतर तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहे.

आधार कार्ड मोफत कसं अपडेट करायचं? (How to Update Aadhaar Card)

सर्वात आधी तुम्हाला myaadhaar.uidai.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे. यानंतर आधार नंबर आणि ओटीपी टाकून लॉग इन करायचे आहे.

यानंतर डॅशबोर्डवर डॉक्युमेंट अपडेट असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला सर्व माहिती द्यायची आहे. यामध्ये नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता दिसेल.

यानंतर तुम्हाला ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा अपलोड करावा लागेल. यासाठी तुम्हाला कागदपत्र अपलोड करावे लागतील.

कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर सबमिट करा. १४ जूनपर्यंत तुम्ही हे काम विनाशुल्क करु शकतात.

यानंतर शेवटी तुमचा रिक्वेस्ट नंबर दिसेल. हा नंबर तुम्ही सेव्ह करा. जेणेकरुन तुम्ही स्टेट्‍स चेक करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

परवेझनं अल्पवयीन हिंदू मुलीला जाळ्यात अडकवलं,८ मित्रांना अश्लील व्हिडिओ पाठवला; खेडामध्येही अमरावतीसारखा कांड

Death News: प्रसिद्ध निर्मात्यावर दु:खाचा डोंगर; अक्षय तृतीयादिवशी जवळच्या व्यक्तीचे निधन

Insomnia: निद्रानाशाने हैराण झालात? आत्ताच व्हा सावध, नाहीतर गमवाल जीव

Maharashtra News Live Update: पुणे-सातारा महामार्गावर कंटेनर पलटी होऊन अपघात

HSC SSC Result 2026 : दहावी-बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख आली समोर, आताच करा नोट

SCROLL FOR NEXT