Adhar Card Update Saam Tv
बिझनेस

Adhar Card: आधार कार्डचे १ नाहीतर ५ जबरदस्त फायदे, सरकारी काम होईल झटपट

Aadhaar Card Importance, Uses, and Benefits: भारतीय असल्याची ओळख म्हणून आधार कार्डचा वापर होतो. कोणतीही सरकारी योजना असो किंवा पुरावा म्हणून आधार कार्डचा वापर होतो. पण याचे इतरही काही फायदे आहेत.

Bhagyashree Kamble

भारतातील प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड आहे. भारतीय असल्याची ओळख म्हणून आधार कार्डचा वापर होतो. कोणतीही सरकारी योजना असो किंवा पुरावा म्हणून आधार कार्डचा वापर होतो. सरकारने आधार कार्ड देण्यासाठी एक संस्था स्थापन केली आहे.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया असे संस्थेचे नाव आहे. यातून ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने आपल्या आधार कार्ड तयार करून मिळेल. पण आपल्याला आधार कार्डचे काही फायदे माहित आहेत का? फक्त नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी नसून, याचे इतरही काही फायदे आहेत.

सरकारी अनुदानासाठी

विविध योजनांअंतर्गत अनुदान मिळविण्यासाठी सरकारने बँक खाते आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. पीएमएवाय, अटल पेन्शन योजना, केरोसीन सबसिडी, शालेय सबसिडी, अन्न सबसिडी आणि इतर योजनांअंतर्गत थेट बँक खात्यात अनुदान मिळविण्यासाठी, बँक खाते आधारशी लिंक असणं गरजेचं अनिवार्य केलं आहे.

ओळखपत्र

आधार हे विश्वासार्ह ओळखपत्रांपैकी एक आहे. त्यात केवळ कार्डधारकाचा फोटोच नाही तर बोटांचे ठसे आणि डोळे यांसारखे बायोमेट्रिक माहिती देखील असते. आधार कार्डमध्ये एक क्युआर कोड देखील असतो. जे स्कॅन करून आपण कार्डमध्ये असलेली माहिती बरोबर आहे की नाही हे तपासू शकतो.

राहत्या जागेच्या पुराव्यासाठी

आधार कार्डमध्ये कार्डधारकाचा निवासी पत्ता असतो. अशाप्रकारे जवळजवळ सर्व सरकारी आणि बिगर-सरकारी पडताळणी प्रक्रियांमध्ये पत्ता पुरावा म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो. तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज इत्यादींसाठी अर्ज करताना आधार कार्डचा वापर पत्त्याचा पुरावा म्हणून वापरला जातो.

बँक खात्यासाठी

बँक खाते उघडण्यासाठी आधार कार्ड आवश्यक कागदपत्रांपैकी एक बनले आहे. बहुतांश बँकांमध्ये अर्जदाराचे बँक खाते उघडण्यासाठी फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड आवश्यक असते.

आयकर

आयकर विभागाने करदात्यांना आधार पॅनशी जोडणे अनिवार्य केले आहे. आता आयकर भरताना आणि रिटर्न भरताना आधार पूर्णपणे अनिवार्य असेल, अन्यथा करदात्यांच्या आयटीआर अर्जाची प्रक्रिया सुरू होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT