8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग लांबणीवर जाणार; कारण काय? वाचा सविस्तर

8th Pay Commission Implementation Date: आठवा वेतन आयोग लांबणीवर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजूनही आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन केलेली नाही. त्यामुळे वेतन आयोग लागू होण्यासाठी उशिर होणार आहे.

Siddhi Hande

आठवा वेतन आयोग लांबणीवर जाणार

अजून वेतन आयोगासाठी समितीची स्थापना नाही

वेतन आयोग उशिरा लागू झाला तर कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२६ पासून एरियर मिळणार

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक ८व्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु आता आठवा वेतन आयोग लागू होण्यास उशिर होणार आहे. आठवा वेतन आयोग २०२७ मध्ये लागू होण्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांची संघटना सरकारकडे माणी करत आहेत की, वेतन आयोग लागू होण्यास वेळ लागू शकतो परंतु तो जानेवारी २०२६ पासून लागू करावा. राष्ट्रीय परिषद जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीचे कर्मचारी बाजूचे सचिव शिव गोपल मिश्रा यांनी सांगितले की, ८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी जरी उशिरा लागू झाल्या. तर पगारात आणि पेन्शनमधील वाढ २६ जानेवारी २०२६ पासूनच मानली जाईल.

मिश्रा यांच्या म्हणण्यांनुसार, वेतन आयोग फक्त दहा वर्षांपर्यंतच लागू असायला हवा. ७वा वेतन आयोग १ जानेवारी २०१६पासून लागू झाला. त्यानंतर आता आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू व्हायला हवा. ७ व्या वोतन आयोगाची शिफारस २०१६ पासून लागू करण्यात आली होती. परंतु कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांचा एरियर दिला होता. त्यामुळे ८व्या वेतन आयोगातदेखील कर्मचाऱ्यांना एरियर मिळायला हवे.

दरम्यान, अजून आठव्या वेतन आयोगासाठी समितीची स्थापना झालेली नाही. जानेवारी २०२५ मध्ये यासाठी मंजुरी दिली होती. मात्र, आता आयोगाच्या Terms of Reference (ToR)ची अधिसूचना जाहीर झाली आहेत. त्यामुळे आता लवकरच समिती स्थापन केली जाईल.

कोणत्याही वेतन आयोगाचा रिपोर्ट तयार होण्यासाठी १८ महिने लागतात. यानंतर मंजुरी मिळण्यासाठी ३ ते ९ महिने लागतात. याचाच अर्थ असा की, आठव्या वेतन आयोगाचा रिपोर्ट येण्यासाठी आणि त्यावर अंतिम निर्णय होण्यासाठी अजून उशिर होणार आहे.त्यामुळे आठवा वेतन आयोग २०२७ मध्ये लागू होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Paper Leak: पेपर फोडणारेच जनता सेवकाच्या वेशात,माफिया मोकाटच

Medical Admission: वैद्यकीय प्रवेशात मॅनेजमेंट कोटा बंद; जागा अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर 2 वर्षांची बंदी

School Closed: मोठी बातमी! पालघरमधील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी

Maharashtra News Live Update: गुजरातमधील मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवर परिणाम; मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द

Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

SCROLL FOR NEXT