8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? संभाव्य तारीख आली समोर

8th Pay Commission Implementation Date: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. २०२७ पर्यंत आठवा वेतन आयोग लागू केला जाऊ शकतो, असं सांगण्यात येत आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार?

एरियर किती मिळणार? वाचा

आठव्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आठवा वेतन आयोग लागू तर झाला आहे पण पगारवाढ कधी येणार, पगारवाढ किती येणार, एरियर किती मिळणार असे अनेक प्रश्न सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान, आता आठवा वेतन आयोग लागू होण्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? (8th Pay Commission Implementation Date)

ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉय फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मंजीत सिंह पटेल यांच्या मते, आयोगाच्या शिफारसी १ जानेवारी २०२६ पासून लागू होऊ शकतात. कर्मचाऱ्यांना पगारवाढ २०२७ पासून मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना १२ महिन्याचा एरियर मिळू शकतो.

आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला शिफारसी सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा वेळ दिला आहे. २०२५ मध्ये ही समिती स्थापन झाली आहे. त्यामुळे शिफारसी सादर झाल्यानंतर आणि केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर पगारवाढ दिली जाईल. यासाठी जवळपास वर्षभराचा तरी वेळ जाईल.

आठव्या वेतन आयोगात कोणाला मिळणार किती एरियर? (8th Pay Commision Arears)

आठव्या वेतन आयोगात ग्रुप ए अधिकाऱ्यांना १२ ते १५ लाख रुपयापर्यंतचा एरियर मिळू शकतो. ग्रुप बी कर्मचाऱ्यांना ७-९ लाखांचा एरियर मिळू शकतो. ग्रुप सी कर्मचाऱ्यांसाठी ५-६ लाखांचा एरियर मिळू शकतो. ग्रुप डी पदांसाठी ४ लाख रुपयांचा एरियर मिळू शकतो.

फिटमेंट फॅक्टर किती असणार आहे त्यावर पगारवाढ आणि एरियर अवलंबून असणार आहे. दरम्यान फिटमेंट फॅक्टर २.८६ ते ३.० मध्ये असण्याची शक्यता आहे. म्हणजेच तुमचा सध्याचा पगार २.९ पटीने वाढू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Maharashtra News Live Update: बीड तालुक्यातील आंबे सावळी परिसरात जोरदार पाऊस

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

केतनच्या हत्येमागचं डिजिटल कनेक्शन उघड, गुगलवर शोधले पर्याय, लोहगडावर सराव

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी डेब्यू कधी करणार? आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही नाही मिळाली संधी

SCROLL FOR NEXT