8th Pay Commission Saam tv
बिझनेस

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी कधी लागू होणार? पगार कधी वाढणार? सरकारने दिली महत्त्वाची बातमी

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगासाठी शिफारसी लागू करण्यात येणार आहे. यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती शिफारसी कधी सादर करणार याबाबत सरकारने माहिती दिली आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन

शिफारसी कधी लागू होणार?

सरकारने दिली माहिती

देशातील कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची प्रतिक्षा आहे. आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार असा प्रश्न विचारला जात आहे.यासाठी आठवा वेतन आयोग समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती शिफारसी सादर करणार आहे. या शिफारशींना मंजुरी मिळाल्यानंतर पुढे वेतन आयोग लागू केला जाणार आहे. आता वेतन आयोगाबाबत राज्यसभेत माहिती दिली आली आहे.

फेब्रुवारीला राज्यसभेत याबाबत माहिती देण्यात आली. राज्यसभेत सांगितले की, ८वा वेतन आयोग समिती स्थापन केली आहे.ही समिती मुदतीआधी शिफारसी देणार आहेत.वित्त राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी लेखी माहितीमध्ये सांगितले की, ३ नोव्हेंबर २०२५ रोजी ८व्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन केली. याचसोबत टर्म्स ऑफ रेफरन्सदेखील निश्चित करण्यात आले आहे. अधिसूचनेनुसार, वेतन आयोगाला १८ महिन्यात शिफारसी सादर करायच्या आहेत.

वेतन, भत्ता आणि पेन्शनबाबत शिफारसी

मंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि पेन्शनबाबत शिफारसी द्यायच्या आहेत. आयोग या मुद्द्यांवर शिफारसी सरकारला देणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय होणार आहे.

पेन्शनधारकांसाठी अपडेट

आठव्या वेतन आयोगात पेन्शनधारकांबाबत अनेक संभ्रम निर्माण झाल आहे. याबाबत त्यांनी सांगितले की, पेन्शनधारकांच्या रिटायरमेंट तारखेमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. कर्मचाऱ्यांना पेन्शन केंद्रीय सिविल सेवा नियमानुसार पेन्शन दिली जाणार आहे. या प्रकारच्या शिफारसी लागू केल्या जाणार आहेत. पेन्शन नियमात कोणतेही बदल करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT