8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! आता ५१००० नाही तर ३०००० होणार बेसिक सॅलरी; नवीन रिपोर्ट समोर

8th Pay Commission Salary Hike Update: आठवा वेतन आयोग लवकरच लागू केला जाईल. आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार याबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आठवा वेतन आयोग लागू होण्याची वाट पाहत आहेत. आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. ८वा वेतन आयोग लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या पगारात १३ टक्क्यांनी वाढ होऊ शकतात. दरम्यान, आता कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ३ पट वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, आता याबाबत नवीन रिपोर्ट आला आहे. त्यानुसार, कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार नसल्याचे दिसत आहे.

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? (When Will 8th Pay Commission Implemented)

आठवा वेतन आयोग हा जानेवारी २०२६ पर्यंत लागू व्हायला हवा. परंतु आठवा वेतन आयोग लागू होण्यास उशिर होणार आहे. २०२६ च्या शेवटी किंवा २०२७च्या सुरुवातीला हा वेतन आयोग लागू होऊ शकतो. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.

किती वाढणार बेसिक सॅलरी?

कोटक इन्स्टिट्यूशन इक्विटीजने याबाबत रिपोर्ट दिला आहे. त्ायनुसार, ८ व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर १.८ ठेवू शकतात. याचाच अर्थ असा की, सध्याच्या पगारात १.८ टक्के वाढवून कर्मचाऱ्यांचा पगार निश्चित होणार आहे. यानुसार, जर कोणाची बेसिक सॅलरी १८००० रुपये असेल तर ती ३०,००० रुपये होऊ शकते. याआधी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ५१००० रुपये होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, या नवीन रिपोर्टनुसार, पगार ३०,००० रुपये होण्याची शक्यता आहे.

काय आहे फिटमेंट फॅक्टर (What Is Fitment Factor In 8th Pay Commission)

फिटमेंट फॅक्टर हे एक गुण आहे. या फिटमेंट फॅक्टरच्या मदतीने सरकार जुन्या वेतनाला नव्या वेतनात बदलते. ७व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ होता त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार वाढला होता. दरम्यान, आता यावेळी फिटमेंट फॅक्टर किती वाढणार यावर कर्मचाऱ्यांचा पगार कधी वाढणार हे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT