8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! कर्मचाऱ्यांच्या पगारात इतक्या टक्क्यांनी होणार वाढ

8th Pay Commission: केंद्र सरकार २०२६ मध्ये आठवा वेतन आयोग लागू करणार आहे. या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार २० ते ३० टक्के वाढू शकतो.

Siddhi Hande

केंद्र सरकार लवकरच आठवा वेतन आयोग लागू करणार आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना खूप फायदा होणार आहे. आठव्या वेतन आयोगात समिती स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. २०२६ मध्ये केंद्रिय कर्मचारी आठवा वेतन आयोग लागू करेन. ८ व्या वेतन आयोगात १० ते ३० टक्के पगार वाढू शकतो. याबाबत अनेक मिडिया रिपोर्टनुसार, पगार १८६ टक्के वाढू शकतो, असं म्हटलं आहे.

मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, ८ व्या वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टरचा निर्णय १ जानेवारी २०२६ रोजी लागू होणाऱ्या महागाई भत्ता आणि मूळ वेतनाच्या आधारे घेतला जाईल.मूळ वेतन हे फिटमेंट फॅक्टरच्या आधारे ठरवले जाते. यामुळेच सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन मिळते.

७ व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ ठेवण्यात आला होता. सातव्या वेतन आयोगात बेसिक सॅलरी ही ७००० रुपयांवरुन १८००० रुपये करण्यात आली होती. दरम्यान, ८ व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.८६ होण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन ५१,४८० होऊ शकते. असं झालं तर सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन १८६ टक्के वाढेल. परंतु अनेक तज्ञांच्या मते, पगार हा १० ते ३० टक्क्यांनी वाढू शकतो.

महागाई भत्त्यात वाढ

आठवा वेतन आयोग लागू झाल्यास महागाई भत्त्यातदेखील वाढ होणार आहे. दरम्यान, २०२५ मध्ये महागाई भत्ता हा दोनदा वाढणार आहे. १ जानेवारी २०२५ आणि १ जुलै २०२५ पासून महागाई भत्ता वाढणार आहे.अद्याप १ जानेवारीच्या महागाई भत्त्याबद्दल कोणतीही घोषणा केली गेली नाही. परंतु महागाई भत्त्या हा या तारखेपासून लागू होणार आहे. २०२५ मध्ये महागाई भत्ता ७ टक्क्यांनी वाढू शकतो. सध्या महागाई भत्ता हा ५३ टक्के आहे.

७ वा वेतन आयोग हा ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपणार आहे. हा वेतन आयोग २०२६ मध्ये लागू करण्यात आला होता. दर दहा वर्षांनी वेतन आयोग लागू केला जातो. दरम्यान आठवा वेतन आयोग २०२६ मध्ये लागू होईल. आठव्या वेतन आयोगामुळे पेन्शनधारकांनाही फायदा होणार आहे. त्यांच्याही पेन्शनमध्ये वाढ होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Heart attack risk: दररोजच्या या ५ सवयी तुमच्या हृदयाला पाडतायत आजारी; डॉक्टरांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

SCROLL FOR NEXT