8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट, पगार आणि पेन्शन कितीने वाढणार?

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगात पगार आणि पेन्शन कितीने वाढणार याबाबत अपडेट समोर आली आहे.

Siddhi Hande

८व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट

आठव्या वेतन आयोगात पगार कितीने वाढणार

जानेवारी २०२६ पासून लागू होणार ८वा वेतन आयोग

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून आठव्या वेतन आयोगाची वाट पाहता आहे. दरम्यान, २०२६ मध्ये हा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. लवकरच याबाबत घोषणा केली जाईल. दरम्यान, आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना अनेक अपेक्षा आहे. मिडिया रिपोर्टनुसार, आठव्या वेतन आयोगात ३० ते ३४ टक्के वेतन आणि पेन्शन वाढू शकते. याचा फायदा १ कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे.

आठव्या वेतन आयोगाचे उद्दिष्ट

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार खाजगी क्षेत्राशी स्पर्धात्मक ठेवण्यासाठी दर दहा वर्षांनी वेतन आयोग लागू केला जातो. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होते. ८ व्या वेतन आयोगाची घोषणा करण्यात आली आहे. परंतु अजून अटी आणि शर्ती (ToR), समितीचे सदस्य आणि अध्यक्ष अजून निश्चित करण्यात आलेली नाही.

सातव्या वेतन आयोगात पगार किती वाढला? (8th Pay Commission Salary Hike)

२०१६ मध्ये सातवा वेतन आयोग लागू केला होता. त्यावेळी १४.३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. फिटमेंट फॅक्टर २.५७ करण्यात आला होता. यामध्ये विविध भत्त्यांसह वाढ २३ टक्के झाली होती. याआधी सहाव्या वेतन आयोगात ५४ टक्के वाढ झाली होती. आता आठव्या वेतन आयोगात किती वाढ होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार आहे?

फिटमेंट फॅक्टरद्वारे कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होते, ते निश्चित केले जाते. ७ व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ होता. दरम्यान, ब्रोकरेज फर्म अँबिट कॅपिटलच्या अहवालानुसार, यावर्षी फिटमेंट फॅक्टर १.८३ ते २.४६ दरम्यान असू शकते. त्यामुळे जर कर्मचाऱ्याचा पगार १८००० असेल तर त्याला नवीन वेतन आयोगानुसार जास्तीत जास्त ४४,२८० रुपये पगार मिळू शकतो.

पगार आणि भत्ते (Salary And Dearness Allowance)

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात फक्त वेतन नव्हे तर महागाई भत्ता, एचआयए, टीएदेखील वाढला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला पगारासह भत्त्यांमध्येही वाढ मिळणार आहे. ही वाढ महागाईवर अवलंबून असणार आहे.

आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार?

आठव्या वेतन आयोगाअंतर्गत जानेवारी २०२६ पासून येणाऱ्या पगारात वाढ अपेक्षित आहे. मात्र, अद्याप याबाबत समिती स्थापन झालेली नाही. त्यामुळे कदाचित आठवा वेतन आयोग लागू होण्यास विलंब होऊ शकतो.

नवीन वेतन आयोग किती वर्षांनी लागू होतो?

नवीन वेतन आयोग हा दर दहा वर्षांनी लागू होतो. ७ वा वेतन आयोग २०१६ मध्ये लागू झाला होता. त्यामुळे यावेळी २०२६ मध्ये नवीन वेतन आयोग लागू होणार आहे.

आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार?

आठव्या वेतन आयोगात पगार ३० ते ३४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : ब्रूक-रूटची शतकीय खेळी, नंतर भारतीय गोलंदाजांचं कमबॅक; ओव्हल कसोटीचा निकाल शेवटच्या दिवशी लागणार

Amit Thackeray: मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडा, मग पोलिसांना द्या: अमित ठाकरे

JK Encounter: पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ६ चकमकी, २१ दहशतवाद्यांना कंठस्नान

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; पीडितेच्या साडीवरील स्पर्म मुख्य पुरावा|VIDEO

Borivali News: तलावात आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, माजी खासदाराचे पालिका प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT