8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगात पगार ३४ टक्क्यांनी वाढणार

8th Pay Commission Salary Hike: आठवा वेतन आयोग लवकरच लागू होणार आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात ३०-३४ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

Siddhi Hande

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात किती टक्क्यांनी वाढ होऊ शकते, याबाबत माहिती समोर आली आहे. एम्बिट या फर्मने ८व्या वेतन आयोगावर आपली इकॉनॉमी रिपोर्ट जारी केली आहे. यामध्ये आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार याबाबत माहिती देण्यात आली आहे. याचसोबत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये किती टक्क्यांनी वाढ होणार याबाबत Ambit ने माहिती दिली आहे.

Ambitच्या रिपोर्टनुसार, आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारत ३० ते ३४ टक्के वाढ होऊ शकते. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, आठव्या वेतन आयोगाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. भारतातील जीडीपी रेट वाढत आहेत. तरीही आठव्या वेतन आयोगाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. याचा लाभ १.१२ कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून आहे.

कर्मचाऱ्यांच्या पगारात कितीने वाढ? (How Much Salary Hike Under 8th Pay Commission)

एम्बिटच्या रिपोर्टनुसार, ७ व्या वेतन आयोगात सरकारने १४ टक्के पगारवाढ केली होती. यानुसार, ८ व्या वेतन आयोगात ३० ते ३४ टक्के वाढ होऊ शकते. जी एकूण खर्चाच्या १५.५ टक्के असू शकते.

एम्बिटच्या रिपोर्टनुसार, बेसिक सॅलरी ५०,००० रुपये आणि महागाई भत्ता ६० टक्के मोजला आहे. यानुसार, पगार १४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे सरकार पगारात एकूण ५४ टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे.

जर फिटमेंट फॅक्टर १.८२ लागू झाला तर बेसिक सॅलरी ५०,००० रुपयांवरुन ९१००० रुपये होणार आहे. जर फिटमेंट फॅक्टर २.१५ झाला तर १०७,५०० रुपये होणार आहे. याचशिवाय अनेक भत्तेदेखील मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पैशांनी गच्च भरलेली बॅग, हातात सिगारेट, मंत्री संजय शिरसाटांचा व्हिडिओ व्हायरल; राज्याच्या राजकारणात खळबळ | VIDEO

Maharashtra Live News Update : परभणीच्या लिमला गावात महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार, विशेष ग्रामसभेत ठराव मंजूर

Red Velvet Cupcake: बर्थडे किंवा पार्टीसाठी घरच्या घरी झटपट बनवा टेस्टी रेड व्हेल्वेट कपकेक

Shubman Gill : सारा तेंडुलकरची आई शुभमन गिलसमोर बसली, रवींद्र जडेजानं चांगलीच फिरकी घेतली; पाहा Video

Kalyan Crime : धावत्या एक्स्प्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT