8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक सॅलरी ₹४६००० होण्याची शक्यता; पगार ३४ टक्क्यांनी वाढणार

8th Pay Commission Salary Hike: आठव्या वेतन आयोगासाठी पगारवाढ कधी येणार असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. दरम्यान, आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ लागू झाला तर पगार ३४ टक्क्यांनी वाढू शकतो.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

फिटमेंट फॅक्टर २.५७ राहण्याची शक्यता

कर्मचाऱ्यांचा पगार ३४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत.आठव्या वेतन आयोगासाठी शिफारसी तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. दरम्यान, आठव्या वेतन आयोगाच्या समितीला शिफारसी सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. दरम्यान, ही पगारवाढ जानेवारी २०२६ पासूनच होणार आहे.

शिफारसी सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा वेळ

वित्त मंत्रालयाने ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन केली. ही समिती शिफारसी तयार करण्यासाठी काम करणार आहे. या कामाला सुरुवात झाली आहे. याबाबत मंत्री पंकज चौधरी यांनी माहिती दिली आहे.

मंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, समिती स्थापनेपासून ते १८ महिन्यांच्या आत वेतन, भत्ता, निवृत्तीवेतन या मुद्द्यांवर शिफारसी सादर करेल.

यानुसार शिफारसी २०२७ मध्ये येण्याची शक्यता आहे. मात्र, यानंतर अजून काही दिवसानंतर सुधारित वेतनश्रेणी लागू होईल. दरम्यान, यामध्ये कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२६ पासूनचा एरियर मिळणार आहे.

फिटमेंट फॅक्टर महत्त्वाचा (Fitment Factor)

सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. याच्या आधारे कर्मचाऱ्यांचा नवीन पगार ठरवला जातो. सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ होता. यामुळे मूळ वेतन ७००० रुपयांवरुन १८,००० रुपये झाले होते. तर उच्च पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे कमाल वेतन २.५ लाखांपर्यंत पोहचले होते.

जर आठव्या वेतन आयोगाने फिटमेंट फॅक्टर २.५७ तसाच ठेवला तर कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ४६,००० रुपयांपर्यंत वाढू शकते. उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढेल.त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार ३४ टक्क्यांनी वाढू शकतो. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील किंमती वाचा

Maharashtra News Live Update: परभणीत उन्हाचा कहर, तापमानाने गाठला 45.2 अंशांचा उच्चांक

Kolhapur : नाद करा पण कोल्हापूरकरांचा कुठे! जावयाला लग्नात दिली तब्बल दीड किलो चांदीची चप्पल, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील

Khopoli Tourism : थंडगार वातावरण अन् अ‍ॅडव्हेंचर, वीकेंडसाठी परफेक्ट आहेत खोपोलीतील 'ही' ठिकाणे

Marathi Actress : ज्येष्ठ अभिनेत्रीचा मोठा निर्णय; राज्य सरकारचा जीवन गौरव पुरस्कार परत केला, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT