8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission : आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? कसं असेल Salary structure? गणित समजून घ्या

8th Pay Commission News : मोदी सरकारने कॅबिनेट बैठकीत ८ व्या वेतन आयोगाला हिरवा कंदील दिला आहे. ८ वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये किती वाढ होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Yash Shirke

8th Pay Commission Updates : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सुधारणा करण्यासाठी ८ व्या वेतन आयोगाला मंजूरी दिली आहे. ८ वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासह डीए आणि अन्य भत्त्यांमध्येही मोठी वाढ होणार आहे. वेतनामध्ये किती प्रमाणात वाढ होणार आहे हे समजून घेऊयात.

आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज (१६ जानेवारी) वेतन आयोगाला हिरवा कंदील मिळाल्याची घोषणा केली. यामुळे केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे. फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेगवेगळ्या स्तरावर सुधारले जातात. ७ व्या वेतन आयोगात वेतन सुधारण्यासाठी २.५७ चा फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता. आता ८ व्या वेतन आयोगात २.८६ चा हाय फिटमेंट फॅक्टर लागू करावा अशी शिफारस केली जात आहे.

काय आहे फिटमेंट फॅक्टर ?

सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्त कर्मचाऱ्याची पेन्शन यात वाढ करण्यासाठी ज्या फॅक्टरचा वापर केला जातो, त्याला 'फिटमेंट फॅक्टर' असे म्हटले जाते. या फॅक्टरच्या आधारे विविध स्तरावर पगारात वाढ केली जाते. यामध्ये सरकारकडून दिल्या जाणाऱअया भत्त्याचा समावेश केला जात नाही.

८ वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या किमान मूळ वेतन हे १८,००० रुपये इतके आहे. ही रक्कम पहिल्या स्तराअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार म्हणून मिळते. नव्या आयोगाच्या शिफारशीच्या अंमलबजावणीनंतर वेतन रचनेमध्ये सुधारणा होईल. यानुसार पहिल्या स्तरामधील कर्मचाऱ्यांचे पगार दुप्पट होतील असे म्हटले जात आहे. वेतनासह निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही वाढ होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही.

७ वा वेतन आयोग २०१६ मध्ये लागू करण्यात आला होता. आता ८ वा वेतन आयोग २०२६ पासून लागू होईल असा अंदाज बांधला जात आहे. केंद्र सरकारच्या वेतन आयोगाला दिलेल्या मंजूरीच्या घोषणेनंतर दीड वर्षांनी वेतन आयोग लागू होईल असे म्हटले जात आहे. वेतन आयोगाचे पालन करण्यास सरकार बांधील नसून त्यामध्ये बदल होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात पारंपारिक पद्धतीची अळुच्या देठांची भाजी कशी बनवायची? सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे, पण परसेंटेज कमी असायला पाहिजे - सदाशिव पाटील

Lonavala Rain: लोणावळा धुक्याच्या चादरीत हरवलं; पिकनिकला जाण्याआधी 'या' ८ महत्त्वाच्या गोष्टी नक्की जाणून घ्या

Reduce spice in food: जेवणात तिखट जास्त पडलं? घाबरू नका या सोप्या टीप्सने दूर करा तिखटपणा

आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त|Ashadhi Ekadashi

SCROLL FOR NEXT