8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट! सरकारी कर्मचाऱ्यांना २० महिन्यांचा एरिअर एकत्र मिळणार? जाणून घ्या कॅल्क्युलेशन

8th Pay Commision Salary Hike Update: आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना एरियर मिळणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना २० महिन्यांचा एरियर एकत्र मिळू शकतो.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

सरकारी कर्मचाऱ्यांना २० महिन्यांचा एरियर मिळणार

१५ लाख रुपये मिळू शकतात

सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार असा प्रश्न कर्मचारी विचारत आहेत. आठवा वेतन आयोग हा १ जानेवारी २०२६ पासून लागू झाला असला तरीही प्रत्यक्ष पगारवाढ कधी येणार, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. याबाबत २०२६च्या शेवटी कंवा २०२७ पर्यंत निर्णय होऊ शकतो.

एरियर किती मिळणार?

आठव्या वेतन आयोगासाठी शिफारसी सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा वेळ दिला आहे. नोव्हेंबरपासून या शिफारसींसाठी काम करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान,अजून शिफारसी लागू होण्यासाठी खूप दिवस लागू शकतात. त्यामुळे या कालावधीचा कर्मचाऱ्यांना एरियर मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना १८ ते २४ महिन्यांचा एरियर मिळू शकतात. त्यामुळे या कालावधीतील वाढीव पगार कर्मचाऱ्यांना एकत्र मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना १५ लाखांपर्यंतचा एरियर मिळू शकतो.

ज्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ५०००० रुपये आहे. त्यांना १५ लाखांपर्यंत एरियर मिळू शकतो. वेगवेगळ्या लेव्हलसाठी बेसिक सॅलरी वेगवेगळी आहेत. त्यामुळे त्याच स्वरुपात पगारवाढ केली जाईल आणि त्याच बेसिक सॅलरीवर आधारित एरियर मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना जर २० महिन्यांचा एरियर मिळाला तर अनेक कर्मचाऱ्यांना लाखो रुपये मिळू शकतात.

फिटमेंट फॅक्टर किती असणार? (8th Pay Commission Fitment Factor)

आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅत्टर २.५७ होता.आठव्या वेतन आयोगासाठी ३.० ते ४.३५ फिटमेंट फॅक्टर असू शकतो. महागाईमुळे फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केली जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार चांगला वाढू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT