8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commisssion: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगार ₹१६,५६० रुपयांनी वाढण्याची शक्यता;वाचा सॅलरी कॅल्क्युलेशन

8th Pay Commission Gross Salary Hike: आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात १६,६६० रुपये वाढ होऊ शकते.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

फिटमेंट फॅक्टर किती असणार?

पगारवाढ किती होणार?

केंद्र सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार अशी उत्सुकता कर्मचाऱ्यांमध्ये आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार किती वाढणार, एचएरए, टीए, महागाई भत्त्यात किती वाढ होणार, असा प्रश्न पडला आहे.दरम्यान, आठव्या वेतन आयोगाचा तुमच्या एकूण पगारावर परिणाम होणार आहे.

आठव्या वेतन आयोगात वेतन सध्याची बेसिक सॅलरी १८००० रुपये आहेत.यामध्ये वाढ होऊन एकूण ग्रॉस सॅलरी मिळते. दरम्यान, आता नवीन वेतन आयोगात ग्रॉस सॅलरी किती होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील

सध्या बेसिक सॅलरी १८००० असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा नवीन मूळ पगार ३४,५६० रुपये होऊ शकतो. HRA आणि TA मिळून पगार ४५,००० रुपयांपेक्षा जास्त होऊ शकतो. सध्या आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता लागू झाला नाहीये. परंतु भविष्यात महागाई भत्ता लागू होईल. तेव्हा पगार ६०,००० रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

फिटमेंट फॅक्टर किती असणार? (8th Pay Commission Fitment Factor)

आठव्या वेतन आयोगातील पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ होता. आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर १.९२ होऊ शकतो. हा फिटमेंट फॅक्टर तुमच्या जुन्या बेसिक सॅलरीशी गुणला जातो. त्यानंतर नवीन बेसिक सॅलरी मिळते.

उदाहरणार्थ, ₹१८,००० × १.९२ = ₹३४,५६० म्हणजेच सध्याच्या बेसिक सॅलरीपेक्षा १६,६६० रुपये जास्त मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात १६ हजारांपेक्षा जास्त वाढ होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

SCROLL FOR NEXT