केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची आतुरतेने वाट पाहतायेत. आयोगाकडून पगार आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार, फिटमेंट फॅक्टर किती असणार आणि नवीन वेतनश्रेणी कधी लागू होणार, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण आयोगाने सरकारला अहवाल दिल्यानंतर प्रत्यक्ष वाढीव पगार खात्यात येण्यासाठी किती वेळ लागणार, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
आठव्या वेतन आयोगाची स्थापना होऊन जवळपास एक वर्ष झालं आहे. सध्या आयोगाचे सदस्य देशातल्या विविध शहरांमध्ये कर्मचारी संघटना आणि पेन्शनधारकांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत आहेत. त्यांच्या मागण्या आणि सूचना जाणून घेतल्या जातायेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयोग मे २०२७ पर्यंत केंद्र सरकारला आपला अहवाल सादर करू शकतो.
आयोगाने अहवाल सादर केल्यानंतर लगेचच वाढीव पगार मिळेल, असं नाही. केंद्र सरकार आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करेल. कोणत्या शिफारशी स्वीकारायच्या, यावर निर्णय घेतला जाईल. तसेच नवीन वेतनश्रेणी लागू करण्यासाठी किती आर्थिक तरतूद करावी लागेल, याचाही विचार केला जाईल.
आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. सहाव्या वेतन आयोगात १.८६, तर सातव्या वेतन आयोगात २.५७ फिटमेंट फॅक्टर होता. यावेळी कर्मचारी संघटनांकडून ४ पर्यंत फिटमेंट फॅक्टरची मागणी केली जात आहे. मात्र, अंतिम आकडा सरकारच्या निर्णयावर अवलंबून असेल.
अंदाजानुसार, सरकार २०२७ च्या अखेरपर्यंत आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर अंतिम निर्णय घेऊ शकते. त्यानंतर संबंधित विभाग पगारवाढीचं गणित तयार करतील. त्यामुळे प्रत्यक्ष वाढीव पगार आणि पेन्शन खात्यात जमा होण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.