

8th Pay Commission Latest News: सध्या सरकारी कर्मचारी पगार वाढीची वाट पाहतायेत. सर्वांचं लक्ष फिटमेंट फॅक्टर, नवीन वेतनश्रेणी, पगारवाढ आणि थकबाकी म्हणजेच एरिअर कधी मिळेल, याकडे लागलं आहे. पण आयोगाचा अहवाल सरकारकडे सादर झाल्यावर लगेचच नवीन वेतन आयोग लागू होईल का? हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात आठव्या वेतन आयोगाने बंगळुरू आणि मुंबई येथे दोन महत्त्वाच्या बैठका घेतल्या. आयोगाला आपल्या स्थापनेपासून १८ महिन्यांच्या आत शिफारशी सादर करायच्या आहेत. आयोगाची स्थापना ३ नोव्हेंबर २०२५ रोजी झाल्यामुळे अहवाल सादर करण्याची शेवटची मुदत ३ मे २०२७ पर्यंत आहे. पण अहवाल नेमका कधी सादर होईल, याची अधिकृत घोषणा झालेली नाही.
अहवालाची सविस्तर तपासणी - आयोगाने शिफारशी सादर केल्यानंतर केंद्र सरकार त्यांचा अभ्यास करेल. यामध्ये फिटमेंट फॅक्टर, बेसिक सॅलरी, भत्ता, पेन्शन आणि इतर सेवा अटींचा विचार केला जाईल.
कोणत्या शिफारशी स्वीकारायच्या? - आयोगाने सुचवलेल्या सर्व शिफारशी सरकार स्वीकारेलच असं नाही. आर्थिक परिस्थिती, प्रशासकीय गरजा आणि उपलब्ध निधी लक्षात घेऊन सरकार निर्णय घेऊ शकतं.
महत्त्वाच्या मुद्द्यांची पुन्हा तपासणी - वेतनवाढ, भत्ता आणि पेन्शनसंदर्भातल्या काही प्रस्तावांवर अतिरिक्त अभ्यास किंवा समितीमार्फत तपासणी होण्याची शक्यता आहे.
अंमलबजावणीसाठी अधिकृत आदेश - अंतिम निर्णयानंतर केंद्र सरकार आवश्यक अधिसूचना आणि आदेश जारी करेल. त्यामध्ये नवीन वेतनरचना, नियम आणि लागू होण्याची तारीख स्पष्ट केली जाईल.
लागू तारीख आणि एरियरचा निर्णय - सरकार लागू होण्याची तारीख निश्चित करेल. त्यानंतर संबंधित विभाग पात्र कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या सुधारित वेतन व पेन्शनची गणना करतील. तसेच थकबाकी म्हणजेच एरियर कधी आणि कशा पद्धतीने द्यायचा, याबाबतही निर्णय घेतला जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.