केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा जून महिन्यातच केली आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. दरम्यान, नवीन आयोगात सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या सॅलरीत बदल होणार आहे. सरकार २०२६ च्या शेवटपर्यंत आठवा वेतन आयोग लागू करु शकते. यामुळे १ कोटी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. दरम्यान, कोणाचा पगार कितीने वाढणार ते जाणून घ्या.
फिटमेंट फॅक्टर
आठवा वेतन आयोग हा फिटमेंट फॅक्टरवर आधारित असतो. सध्या सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५८ आहे. ज्यात लेव्हल १ कर्मचाऱ्यांचा पगार ७००० ते १८००० रुपये आहे. त्यात सर्व भत्ते जोडले त्यानंतर ३६,०२० रुपये मिळणार आहे. ज्यातील बेसिक सॅलरी १८,००० रुपये आहे.
सध्या फिटमेंट फॅक्टर २.५७ आहे. हा फिटमेंट फॅक्टर वाढण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टर २.८६ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार चांगला वाढणार आहे.
कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार?
फिटमेंट फॅक्टर २.०८ झाला तर कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी १८००० ते ३७,४४० रुपये होऊ शकते. पेन्शन ९००० रुपयांवरुन १८,७२० होऊ शकते. जर फिटमेंट फॅक्टर २.८६ झाला तर कर्मचाऱ्यांच्या पगारत १८६ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. बेसिक सॅलरी ५१,४८० रुपये आणि पेन्शन २५,७४० रुपये होऊ शकते.
आठव्या वेतन आयोगात कोणाचा पगार किती वाढणार? (Government Employees Salary Hike Under 8th Pay Commission)
आठव्या वेतन आयोगात जर फिटमेंट फॅक्टर २.८६ असेल तर तुमचा पगार कितीने वाढणार हे जाणून घ्या.
लेव्हल १- शिपाई किंवा डिविजन क्लर्क पदासाठी सध्या बेसिक सॅलरी १८००० रुपये आहे. ही वाढवून ५१,४८० रुपये होईल. त्यांच्या पगारात ३३,४८० रुपयांनी वाढ होईल.
लेव्हल २- लोअर डिविजन क्लर्क पदासाठी बेसिक सॅलरी १९,९०० रुपये आहे. हा पगार ५६,९१४ रुपये होईल. एकूण पगारात ३७,०१४ रुपयांनी वाढ होईल.
लेव्हल ३- या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी २१,७०० रुपये आहे. हा पगार ६२,०६२ रुपये होईल म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात ४०,३६२ रुपयांनी वाढ होईल.
लेव्हल ४- ग्रेड डी स्टेनोग्राफर आणि ज्युनिअर क्लर्क यांचा पगार २५,५०० रुपये आहे. हा पगार ७२,९३० रुपये होईल. या पगारात ४७,४३० रुपयांची वाढ होईल.
लेव्हल५- सिनियर क्लर्क आणि टेक्निकल कर्मचाऱ्यांच्या पगार सध्या २९,२०० रुपये आहे.त्यांचा पगार ८३,५१२ रुपये होऊ शकते. यामुळे त्यांच्या पगारात एकूण ५४,३१२ रुपयांनी वाढ होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.