8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधी? एरियर किती मिळणार? वाचा कॅल्क्युलेक्शन

8th Pay Commission Arear: आठवा वेतन आयोग लागू झाला आहे. परंतु कर्मचाऱ्यांचा पगारवाढ होण्यास अजून काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. या कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना एरियर मिळणार आहे.

Siddhi Hande

आठवा वेतन आयोग लागू

कधीपासून येणार पगारवाढ?

एरियर किती महिन्यांचा मिळणार?

सरकारी कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन लागू झाला आहे. नवीन वेतन आयोग लागू झाला असला तरीही कर्मचाऱ्यांना अजून पगारवाढ मिळालेली नाही.आठव्या वेतन आयोगाअंतर्गत पगारवाढ लवकरच मिळेल. दरम्यान, आता जोपर्यंत नवीन वेतन आयोगाअंतर्गत पगार मिळत नाही त्या महिन्यापर्यंत कर्मचाऱ्यांना एरियर दिला जाईल.आता प्रत्येक कर्मचाऱ्याचा पगार कितीने वाढणार त्यावर एरियर किती मिळणार हे अवलंबून असते.

जानेवारी २०२६ पासून कर्मचाऱ्यांच्या पगारात बदल झाले आहेत. जर नवीन वेतन आयोग २०२७ मध्ये लागू झाला तर तोपर्यंत एरियर मिळणार आहे. याचसोबत पेन्शनदेखील मिळणार आहे.

कधीपर्यंत लागू होणार आठवा वेतन आयोग? (When will 8th Pay Commission Implemented)

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, १० वर्षात नवीन वेतन आयोग लागू केला जातो. याआधी वेतन आयोग २०१६ मध्ये लागू झाला होता. ज्या दिवशी वेतन आयोग लागू होईल त्या दिवसापासून कर्मचाऱ्यांचा पगार वाढतो. दरम्यान, आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ही समिती शिफारशी सादर करेल. यानंतर शिफारशींना मंजूरी मिळाल्यानंतर वेतन आयोग लागू केला जाईल.

आठव्या वेतन आयोगाअंतर्गत पगार कधी येणार?मिडिया रिपोर्टनुसार, आठव्या वेतन आयोगाची अधिसूचन २०२६ च्या शेवटच्या सहा महिन्यात किंवा २०२७ च्या सुरुवातीला येऊ शकतो.

कर्मचाऱ्यांना मिळणार एरियर

जर आठवा वेतन आयोग मे २०२७ मध्ये लागू झाला तर कर्मचाऱ्यांना २०२६ पासून तोपर्यंत एरियर मिळणार आहे. एरियरचे कॅल्क्युलेशन रिवाइज सॅलरीवर अवलंबून असते. जर तुमचा पगार ४५००० रुपयांवरुन ५०००० रुपये झाला तर ५००० रुपये एरियर मानला जाईल. जर तुम्हाला १५ महिन्यांसाठी हा एरियर मिळणार असेल तर एकूण ७५००० रुपये मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: भाविकांवर काळाचा घाला! ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू

Power Cut : पावसाळ्यामुळे घरात लाईट वारंवार जाते? तर 'हे Smart Gadgets' ठरतील उपयोगी

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गोदावरीला आलेला पूर ओसरला

Shocking : पहिली बायको असताना पोलिस करत होता दुसरं लग्न, जाब विचारताच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; हिंगोलीतील संतापजनक घटना

अस्सल गावरान स्टाईल चिवळीची भाजी कधी खाल्लीये का? एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा| Chivalichi Bhaji Recipe

SCROLL FOR NEXT